Mumbai sakal
मुंबई

Mumbai Rain Update : बारवी धरण आले काठोकाठ भरत

धरण काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सुजित गायकवाड

बदलापूर - सतत सुरू असलेल्या पावसामुळे बारवी धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी 7 वाजता धरणाची पातळी 70.64 मी एवढी झाली असून धरण काठोकाठ भरले आहे.

बारवी धरणाची पाणी पातळी 72.60 मीटर असून धरणावर स्वयंचलित दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यामुळे बारवी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तानसा, भातसा पाठोपाठ बारवी धरण देखील भरल्याने ठाणे जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटला आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये गेले काही दिवस पाऊस पडतोय.तसेच ठाणे जिल्हातील धरण क्षेत्रात सुद्धा समाधानकारक पाऊस झाला आहे. बदलापूर मधील बारवी धरण क्षेत्रात सुद्धा पाऊस चांगला झाला असल्याने बारवी धरण भरले आहे.

दरम्यान बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दुशांत उईके यांनी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी तालुक्याच्या तहसीलदारांना बारवी धरणाच्या पाण्याच्या पातळीबाबत पत्र दिले आहे.या पत्रामध्ये धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.बारवी धरणावरती 11 स्वयंचलित वक्रद्वारे बसविण्यात आलेली आहेत व त्याची उच्चतम विसर्ग पातळी 72.60 मीटर आहे.

बारवी धरणाची पाणी पातळी 72.60 मी. वर गेल्यानंतर स्वयंचलित वक्रद्वारे आपोआप उघडून पाण्याचा विसर्ग सुरु होतो व स्वयंचलित वक्रद्वारे आपोआप बंद होऊन पाण्याचा विसर्ग थांबेल.

सद्यस्थितीतील चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे उल्हास नदीत पूर परिस्थिती उद्भवलेली असल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करणे शक्य होत नसल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करता धरणाची पाणी पातळी कधीही 72.60 मी. तलांक गाठून स्वयंचलित वक्रद्वारे आपोआप उघडून बारवी धरणातून बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु होऊ शकतो.

बारवी नदीच्या तीरावरील अस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादोरपाडा, कारंद, मोन्याचापाडा, चोण, रहाटोली व नदी काठावरील इतर शहरे व शहरातील सरकारी यंत्रणा तसेच गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांनी गांवातील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असलेबाबत सतर्कतेच्या सूचना एमआयडीसी प्रशासनाने दिल्या आहेत.

पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरीकांना व पर्यटकांना प्रवेश न करण्याबाबत तसेच नदीच्या पात्रात पोहण्यास मज्जाय एमआयडीसी ने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT