anil deshmukh  
मुंबई

प्लाझ्मा थेरपी संदर्भात फसवणूक होण्यापासून सावधान; गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आवाहन.. 

अनीश पाटील

मुंबई : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी ही उपयुक्त ठरत आहे, परंतु या संदर्भातही फसवणूक  होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या पासून सावध राहावे असे आवाहन  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

डॉक्टरांची मते व निरीक्षणावरून  ‘प्लाझ्मा थेरपी’ कोविड  रूग्णांसाठी एक उपचार पद्धती म्हणून उदयास आली आहे. जास्तीत जास्त कोविड रूग्णांना  मदत करण्यासाठी विविध राज्य व रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा देणगी(डोनेशन) मोहीम सुरू केली आहे.

प्लाझ्मा देणगीदाराच्या कमतरतेमुळे ही थेरपी महाग आहे.काही निवडक रुग्णालयात ही उपचार पद्धती करण्यात येते. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, कोरोनातून बरे झालेले  बेरोजगार तरुण आवश्यकतेनुसार थेट लोकांना प्लाझ्मा दान देताना आढळून आले आहेत. 

प्लाझ्मा दान  करण्यासाठी कोविड मधून बरे झाल्याचा वैद्यकीय अहवाल आणि प्लाझ्मा दान करण्यास तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.गरजू लोकांच्या बिकट परिस्थितीचा फायदा घेत त्यांना फसवण्याचा उद्देशाने बनावट प्रमाणपत्र देखील तयार केली जात आहेत. ही खोटी प्रमाणपत्रे दाखवून लाखो रुपये  गरजू रुग्णांना कडून घेतले जाऊ शकतात.

 सायबर गुन्हेगार यासाठी समाज माध्यमांवर विविध युक्त्या देखील वापरत आहेत.डार्क वेब आणि बेकायदेशीर वाहिन्यांवर प्लाझ्माची विक्री संदर्भात  फसवणूक होऊ शकते.  त्या विरुद्ध कडक  कारवाई केली जाईलच. तथापि सर्व संबंधित लोकांनी या प्लाझ्मा थेरपी उपचाराबाबत जागरूक रहावे. सावध असावे. प्लाझ्मा दाता ऑनलाईन शोधतांना काळजी घ्यावी.

हेही वाचा: रुग्णसेविकांच्या वेतन कपातीबाबत खुलासा करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश.. 
 

नागरिकांनी कोणत्याही कोविड उपचाराच्या सुरक्षित पद्धतींवरच अवलंबून असले पाहिजे. जर या संदर्भात काही फसवणूक  होत असेल तर कृपया आपल्या नजीकच्या पोलिस ठाण्याला  कळवा. तसेच www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

संपादन: अथर्व महांकाळ 

be aware of cyber crime related to plasma therapy  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT