रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना सुरक्षित सेवा देणारी बेस्ट आता बंद करण्यात येणार आहे. बेस्टची नाईट शिफ्ट बंद झाल्यामुळे आता रात्री प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
रात्रपाळीला कामावर जाणाऱ्या आणि कामावरुन रात्री उशिरा येणाऱ्या मुंबईकरांना बसची सुविधा दिलासा देणारी होती. मात्र या सेवेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
एकेकाळी शिफ्टमध्ये काम करणाऱ्या मिल कामगारांसाठी ही सेवा उपयुक्त ठरत होती. त्यानंतर रात्री उशिरा कामावरुन सुटणारे, रात्रीच्या शिफ्टला कामावर जाणारे अनेक नोकरदार या बेस्ट बससेवेचा लाभ घेत होते. मात्र आता रात्री १२ ते ४ या वेळेमध्ये बेस्टची बस सेवा बंद करण्यात येत आहे.
रात्रीचा उशिरा टॅक्सी, रिक्षाचालक अवास्तव भाडे आकारतात. त्यामुळे मुंबईकरांना बेस्टचा दिलासा होता. मात्र आता ही सेवा बंद झाल्याने मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.