Best-Buses 
मुंबई

चांगली बातमी! BEST सर्वसामान्यांसाठीही खुली; जाणून घ्या नियम

बेस्ट प्रशासनाचा निर्णय, पाहा कधीपासून सुरू होणार सेवा

विराज भागवत
  • बेस्ट प्रशासनाचा निर्णय, पाहा कधीपासून सुरू होणार सेवा

मुंबई: महाराष्ट्र सरकारने लॉकडाउनबद्दलची (Maharashtra Lockdown) नवी नियमावली (New Guidelines) जाहीर केली. यातील काही निकषांवरून मुंबईचा (Mumbai) समावेश नक्की कोणत्या टप्प्यात (Level) या बद्दलचा संभ्रम होता. पण अखेर तिसऱ्या टप्प्यात (Third Level) मुंबईचा समावेश होतो हे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे, लोकल ट्रेनला (Local Trains) अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. राज्य सरकारने (State Govt) महिलांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती, पण पालिकेने मात्र ही परवानगी नाकारली. अस असले तरी आता बेस्ट (BEST) प्रशासनाने मुंबईकरांना दिलासा दिला आहे. बेस्ट बससेवा सोमवारपासून (७ जून) सर्वसामान्यांच्या सेवेत हजर असणार आहे. (BEST Bus services for general public will resume in Mumbai from Monday with some rules and conditions)

महाराष्ट्र शासनाने ४ जूनला जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ब्रेक द चेन अंतर्गत बेस्टच्या बससेवेला सोमवारपासून पूर्ण आसनक्षमतेनुसार प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा सुरू होती. पण सोमवारपासून सर्वसामान्य नागरिकांनाही बससेवेचा लाभ घेता येणार आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे, बससेवेत केवळ बसून प्रवास करण्याच्या क्षमतेइतक्याच प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. उभे राहून (Standing) प्रवास करता येणार नाही. केवळ जेवढ्या सीट्स आहेत तितकेच प्रवासी बसमध्ये एका वेळी प्रवास करू शकतात. याशिवाय, प्रत्येक प्रवाशाला मास्क वापरणंही बंधनकारक असणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टकडून अधिकाधिक बसगाड्या चालविल्या जाणार आहेत. मुंबईकर प्रवासी जनतेने कृपया बसमधून प्रवास करतेवेळी तोंडावर मास्क अवश्य लावावा अशी विनंती बेस्टकडून करण्यात आली आहे.

मुंबईत काय सुरु, काय बंद? (New Guidelines)

  • दुकाने- सर्व दुकाने, आस्थापने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर आस्थापने दुकाने शनिवार, रविवार बंद राहणार.

  • उपहारगृह- संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी. संध्याकाळी 4 नंतर फक्त पार्सल सेवा सुरू ठेवण्यास परवानगी

  • सार्वजनिक उद्याने, मैदाने, सायकलिंग आणि मॉर्निंग/इव्हनिंग वॉक- पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत परवानगी

  • मैदानी खेळ- पहाटे 5 ते सकाळी 9 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत परवानगी

  • खासगी कार्यालये (अत्यावश्‍यक सेवा वेगळता)- संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

  • सांस्कृतिक, सामाजिक, करमणूक कार्यक्रम- क्षमतेच्या 50 टक्के संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू पण शनिवार रविवार बंदी.

  • विवाह- 50 व्यक्तींची उपस्थिती, दोन तासांची अट नाही.

  • अत्यंसस्कार- 20 माणसांची उपस्थिती

  • बांधकाम- बांधकामाच्या ठिकाणी कामगार उपलब्ध असल्यास किंवा बाहेरुन कामगार आल्यास संध्याकाळी 4 वाजेपर्यंत परवानगी

  • जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर- संध्याकाळी 4 वाजेपर्यंत क्षमतेच्या 50 टक्के परवानगी

  • ई-कॉमर्स- सर्व सेवा पुरवण्यास परवानगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

Vaijapur Assembly Election 2024 Result Live: वैजापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत रमेश बोरनारे यांनी मारली बाजी

Gangapur Assembly Election 2024 Result Live: भाजपचे प्रशांत बंब विजयी, सतिश चव्हाणांवर केली मात

Tanaji Sawant won Paranda Assembly Election 2024 : परांडा मतदारसंघात तिरंगी लढाईत तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी मारली बाजी

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

SCROLL FOR NEXT