मुंबई

कामावर न येणाऱ्या कामगारांना  बेस्ट प्रशासनाचा दणका

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे हजर न राहू शकणाऱ्या कामगारांना बेस्ट प्रशासनाने मेमो देण्यास सुरुवात केली आहे. अत्यावश्‍यक सेवेसाठी मनुष्यबळाची गरज असल्याने कामगारांना तातडीने रुजू होण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन झाल्यास कामगारांवर कारवाई केली जाणार आहे. 
बेस्ट उपक्रमाचे अनेक कामगार पालघर, अंबरनाथ, कर्जत, कसारा या भागांत राहतात. लोकल सेवा बंद असल्याने बेस्ट आगारांत पोहोचायचे कसे, असा प्रश्‍न आहे. त्यात प्रशासनाने मेमो पाठवण्यास सुरुवात केल्यामुळे काय करायचे, हे या कामगारांना समजेनासे झाले आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कामगारांच्या वेतनात कपात करू नये अथवा त्यांना काढू टाकू नये, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर बेस्ट उपक्रमाने कामगारांना नोटिसा दिल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

अत्यावश्‍यक सेवेसाठी हजर होणे बंधनकारक असल्याचे उपक्रमाने कामगारांना पाठवलेल्या मेमोमध्ये नमूद केले आहे. कामावर रुजू न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आल्यामुळे अनेक कामगारांच्या पायाखालील जमीन सरकली आहे. सध्या बेस्ट उपक्रमाकडून लांब राहणाऱ्या कामगारांसाठी बससेवा पुरवली जाते. परंतु, अधिक अंतरावर राहणाऱ्या कामगारांना या सेवेचा लाभ घेणे अशक्‍य होत आहे. त्यामुळे कारवाईच्या इशाऱ्यामागील कारण समजत नाही, असे कामगारांचे म्हणणे आहे. 

बससेवा पुरवा 
प्रवासाचा अन्य पर्याय नसल्याने कामावर हजर कसे राहायचे, या कामगारांच्या सवालावर बेस्ट प्रशासनाकडे काहीही उत्तर नाही. बससेवा पुरवल्यास आम्ही कामावर येऊ, असे कामगारांचे म्हणतात. बेस्ट कामगारांना पुरेशा सोईसुविधा देण्याऐवजी मेमो देणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया बेस्ट कामगार सेनेचे कार्याध्यक्ष ऍड्‌. उदय आंबोणकर यांनी दिली आहे.

Best governance penalty for non-working workers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

Latest Maharashtra News Updates : युगेंद्र पवारांच्या सांगता सभेत शरद पवारांंचं भाषण

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Winter Detox Tea: हिवाळ्यातच नाही तर बाराही महिने हे पेय तुम्ही पिऊ शकता. चरबी घटवण्यासह देते इतरही आरोग्याचे फायदे

SCROLL FOR NEXT