मुंबई : कोरोना संसर्गामुळे हॅन्ड सॅनिटायझरला मोठी मागणी आहे. मात्र बऱ्याच दुकानांमध्ये ग्राहकांना हॅन्ड सॅनिटायझरच्या ऐवजी हॅन्ड क्लिनर दिला जातोय. यातील फरक सर्वसामान्य ग्राहकाच्या लक्षात येत नसल्याने त्याची फसवणूक होत आहे. ऑल फूड अँड ड्रग्स लायसेन्स होल्डर फाउंडेशनने पत्र लिहून यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
कोरोना संसर्गामुळे हाताच्या स्वच्छतेवर अधिक भर दिला जातोय. त्यासाठी अल्कोहॉलिक हॅन्ड सॅनिटायझर हे जंतुनाशक वापरण्याचा सल्ला तज्ञ डॉक्टरांकडून दिला जातोय. त्यामुळे सॅनिटायझरची मागणी मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. मागणी वाढल्याने अल्कोहॉलिक हॅन्ड सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. यावर पर्याय म्हणून दुकानदारांकडून हॅन्ड क्लिनर ग्राहकांना दिला जातोय. हॅन्ड क्लिनर हे जरी जंतुनाशक म्हणून वापरले जात असले तर कोरोनासह इतर संसर्गजन्य आजारांशी संबंधित जंतूंवर त्याचा फारसा परिणाम होत नाही.
BIG NEWS - सुशांत सिंग राजपूत प्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी बॉलिवूडच्या बड्या कंपनीला दिलेत 'हे' आदेश...
कोरोना संसर्ग पसरल्यानंतर सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. आज ही राज्यात दररोज 5 लाख बॉटलची विक्री होत आहे. मागणी वाढल्याने दुकानात सॅनिटायझरचा तूटवडा निर्माण झाला. यावर पर्याय म्हणून सरकारने कॉस्मेटिक तसेच आयुर्वेदिक कंपन्यांना सॅनिटायझरचे उत्पादन घेण्याची परवानगी दिली. या कंपन्यांकडून सॅनिटायझरच उत्पादन सुरू झाले. मात्र या कंपन्यांकडून सुरू झालेले उत्पादन हे हॅन्ड सॅनिटायझरचे नसून हॅन्ड क्लिनरचे आहे. मात्र दुकानदार सर्रासपणे हॅन्ड सॅनिटायझरची मागणी केली असता हॅन्ड क्लिनर देऊन ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा आरोप ऑल फूड अँड ड्रग्स लायसेन्स होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे.
हात स्वच्छ करण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझर, हॅन्ड क्लिनर किंवा साबण ही वापरू शकतो. मात्र हात स्वच्छ करतांना ते शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थित करणे गरजेचे आहे. याकडे ग्राहकांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. - डॉ.अविनाश भोंडवे , अध्यक्ष , इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र
तीन महिन्यांपूर्वी राज्यात हॅन्ड सॅनिरायझर बनवणाऱ्या 150 कंपन्या होत्या मात्र साधारणता दोन महिन्यांपूर्वी सरकारने कॉस्मेटिक तसेच आयुर्वेदिक कंपन्यांना सॅनिटायझर बनवण्याची परवानगी दिल्या नंतर आज राज्यात 350 हुन अधिक कंपन्या हे उत्पादन घेत आहेत. आज राज्यात जरी सॅनिटायझरचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असलं तरी कॉस्मेटिक आणि आयुर्वेदिक कंपन्यांकडून बनवण्यात येणाऱ्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर नक्कीच प्रश्न चिन्ह उभे केले जातंय.
औषध कंपन्यांकडून बनवण्यात येणारे सॅनिटायझर हे सरकारने आखून दिलेल्या नियमावली प्रमाणे बनवलं जात. यासाठी प्रत्येक कंपनीत त्या क्षेत्रातील तज्ञ कार्यरत आहेत. इथे तयार होणाऱ्या उत्पादनाची गुणवत्ता तसण्यासाठी प्रत्येक कंपनीत प्रयोगशाळा असणे गरजेचे असून तयार होणाऱ्या प्रत्येक उत्पादना दर्जा तपासण्यात येतो. मात्र सध्या या सर्व बाबींना फाटा देण्यात आला असल्याचा आरोप ही पांडे यांनी केलाय.
बाजारात उपलब्ध असलेले हॅन्ड क्लिनर 100 ते 125 रुपयात मिळते. शिवाय हॅन्ड क्लिनरच्या विक्रीवर दुकानदाराला एका बाटलीच्या मागे 70 ते 80 रुपयांचा नफा होतो. त्यामुळे दुकानदार मोठ्या प्रमाणावर हॅन्ड क्लिनर ठेवतात. मात्र ग्राहकाला त्यातील फारशी माहिती नसल्याने त्यांची फसवणूक होते. शिवाय हा ग्राहकांच्या जीवाशी खेळ असल्याने औषध कंपन्यांच्या व्यतिरिक्त इतर कंपन्यांना हॅन्ड सॅनिटायझर बनवण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी पांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.शिवाय ग्राहकांनी ही सजग राहून गुणवत्तापूर्ण चांगल्या कंपन्यांचे उत्पादन विकत घ्यावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
beware of trap you are buying hand wash instead of hand sanitizer
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.