BJP hindutva is sanatani hindutva Sushma Andhare washim politics sakal
मुंबई

Bhivandi: मतदारसंघ कोणाच्याही नावावर नसतो; सुषमा अंधारेंचा कपिल पाटलांवर निशाणा

Chinmay Jagtap

मतदारसंघ कोणाच्याही नावावर नसतो, तो जनतेच्या नावावर असतो. त्यामुळे कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा आपली जहागीर समजू नये. त्यांना येणाऱ्या निवडणुकीत ‘दूध का दूध, पानी का पानी करून दाखवू’, असा वज्रनिर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. भिवंडी भिनार येथे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

भिवंडीत भाजपचे अनुसूचित जमाती मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष महादेव घाटाळ यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी व वाडा तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिकडे सत्ता तिकडे पक्षप्रवेश हे समीकरण असते; पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यावर सर्वांचा विश्‍वास आहे.

त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढत आहे, असे सांगत सुषमा अंधारे यांनी भाजप व शिवसेना शिंदे गटावर टीका केली. भाजप मराठा व ओबीसी समाजात आपापसात भांडणे लावून देत असल्याचे त्यांनी सांगितले.

एका नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मी मराठा आरक्षण देणार असे सांगायचे; तर एकाने ओबीसींच्या सोबत आहे असे सांगायचे. तुम्ही नक्की कोणाच्या सोबत आहात हे जनतेला कळत नाही. भाजपची आरक्षण देण्याची खरी नियत असेल तर त्यांनी विधानसभेत कायदा करून केंद्राकडे पाठवावा. केंद्राने विशेष अधिवेशन घ्यावे, भाजपने जातीजातींच्या लोकांना आपापसात झुंजवू नये, असा सल्ला सुषमा अंधारे यांनी दिला.

याप्रसंगी उपनेत्या ज्योती ठाकरे, भारतीय कामगार सेनेचे माजी सरचिटणीस कृष्णकांत कोंडलेकर, भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार रूपेश म्हात्रे, भिवंडी ग्रामीण जिल्हाप्रमुख विश्‍वास थळे, सह संपर्कप्रमुख सोन्या पाटील, महिला संपर्कप्रमुख विद्या साळी, भिवंडी शहर जिल्हाप्रमुख मनोज गगे, भिवंडी लोकसभा युवासेनाप्रमुख ॲड. अल्पेश भोईर, ठाणे शहरप्रमुख केदार दिघे, तालुकाप्रमुख कुंदन पाटील, भिवंडी शहरप्रमुख प्रसाद पाटील, जिल्हा सचिव जय भगत, महिला शहर संघटिका वैशाली मेस्त्री यांच्यासह शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT