covid centre 
मुंबई

भिवंडीत कोरोनाबाधितांची चिंता मिटणार, उभारण्यात येणार तब्बल 'इतक्या' खाटांचे कोव्हिड सेंटर

शरद भसाळे : सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत  असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोना रूग्णांना भिवंडी शहरात  हाँस्पिटल उपलब्ध होत नसल्याने मोठी पंचायत निर्माण झाली आहे. गोदाम व्यवसायात काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांना अधिक प्रमाणात ही लागण झपाट्याने होत असून, भिवंडी तालुका आरोग्य यंत्रणा यास प्रतिबंध घालण्यात अपयशी ठरत  असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जनजागृती करून आरोग्य तपासणी सुरू झाली आहे.जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने भिवंडी तालुक्यातील सावद ग्रामपंचायत क्षेत्रातील एका गोदामात एक हजार बेडचे कोव्हिड सेंटर उभारण्यात येत आहे. या केंद्रातील काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. असून ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा सागर लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी आज दुपारी या निर्माणाधिन कोव्हिड केअर सेंटर ला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली.

रूग्णांना दिलासा देण्यासाठी नव्या कोव्हिड केअर सेंटरची तयारी सुरू असून ग्रामीण भागातील रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे. या केंद्रात 200 बेड ऑक्सिजन व 100 बेड आयसीयू चे असणार असल्याची माहिती यावेळी  तहसीलदार शशिकांत गायकवाड दिली आहे.

(संपादन : वैभव गाटे)

in Bhiwandi 1000 bed covid center to be set up

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT