मुंबई

Bhiwandi Crime: धक्कादायक प्रकार! बालिका आश्रमातील तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटावर, पाठीवर दिले चटके; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी: बदलापूर येथे बालिकेवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच भिवंडीत खासगी बालिका आश्रमातील एका चिमुरडीला चटके दिल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आश्रमाचा संचालक दत्ता गायसमुद्रे याला अटक करण्यात आली आहे.

अमिना बाग परिसरात राहणाऱ्या एका महिलेने तिच्या तीन वर्षांच्या नातीला धामणकर नाका येथील महावीर कॉम्प्लेक्स इमारतीत दत्ता गायसमुद्रे याच्या सेवाभावी संस्थेतर्फे सुरू असलेल्या शोभा बालिका आश्रमात ठेवले होते.

२३ मे ते १५ जुलै २०२४ दरम्यान गायसमुद्रे याने या चिमुरडीच्या पोटावर, पाठीवर आणि डाव्या कानामागे व डाव्या डोळ्याच्या बाजूला चटके दिल्याने जखमा झाल्या होत्या.

हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) सह बालन्याय (मुलांची काळजी) हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१५ चे कलम ७५ नुसार गुन्हा दाखल करून गुरुवारी गायसमुद्रे याला अटक केली. शुक्रवारी भिवंडी न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आनंद राठोड यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT