मुंबई

Bhiwandi Crime: पाच जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता होता तडीपार,भिवंडी पोलीसांनी केली अटक

सकाळ वृत्तसेवा

Bhiwandi : भिवंडीतुन हद्दपार केलेले दोन आरोपिंना नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. अनिल बजरंग राठोड(२७) असे हद्दपार केलेल्या आरोपीचे नाव असून तो कारीवली गावात राहत होता. त्यास पाच जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले होते. असे असताना तो अंजूरफाटा चौक येथे आढळून आला.

तर साठेनगर येथे राहणारा वैभव गोपाळ पवार(२४)यास २ वर्षाकरिता पाच जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तो दर्शन देशी बार,अंजूरफाटा येथे आढळून आला. या दोघांविरोधात नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

महिलेला धक्का मारून मंगळसूत्र चोरले

भिवंडी,ता.१७ (बातमीदार) : शहरात पद्मानगर येथील पद्मशाली हॉल जवळ मंगल बिल्डिंगमध्ये जिन्यावर चढणाऱ्या महिलेला धक्का देत तिचे मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगल बिल्डिंगमध्ये राहणारी पुष्पलता महादेव चिप्पा(५८) हि आपल्या खोलीत जाण्यासाठी जिन्यावर चढत असताना तिला शामल बाळकृष्ण राजन (२७) याने मागून येत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचुन नेले. त्यास प्रतिकार केला असता त्याने जोरात धक्का मारून महिलेला खाली पाडले आणि तिला जखमी केले. या प्रकरणी पुष्पलता चिप्पा हिने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी शामल बाळकृष्ण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT