मुंबई

शेतीसाठी भिवंडीतल्या शेतकऱ्याने खरेदी केले चक्क 30 कोटींचं हेलिकॉप्टर

पूजा विचारे

मुंबई: हौसेला मोल नसतं.. हेच भिवंडी तालुक्यातील वडपे इथल्या शेतकरी असलेल्या उद्योजकाने दाखवून दिलं आहे. जनार्दन भोईर यांनी शेतीकामाशी जोडधंदा असलेल्या व्यवसायासाठी चक्क हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. त्यांच्या या हेलिकॉप्टर खरेदीची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे.

भिवंडीमध्ये गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारल्याने या भागात आर्थिक सुबत्ता आली आहे. वडपे गावात राहणारे आणि मूळचे शेतकरी असलेले जनार्दन भोईर यांनी चक्क 30 कोटी रुपयांचं हेलिकॉप्टर खरेदी केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भोईर यांनी बांधकाम व्यवसायाला सुरुवात करून आपल्या जमिनीवर गोदाम बनवले आहे. तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली आहे. स्वतःच्या दुग्ध व्यवसायासाठी पंजाब, हरियाणा, गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी नेहमी जावं लागतं. तर व्यवसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचं भोईर यांनी सांगितलं आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
येत्या 15 मार्चला भोईर यांच्याकडे हेलिकॉप्टर येणार आहे. त्यापूर्वी जागेवरील व्यवस्थेची चाचपणी करण्यासाठी मुंबईतून काही तंत्रज्ञ हेलिकॉप्टर घेऊन वरपे गावात आले. अडीच एकर जागेवर संरक्षण भिंती सह हेलिपॅड, हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, पायलट, इंजिनियर सुरक्षारक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. 

दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये भोईर स्वतः न बसता नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय सदस्यांना फेरफटका मारून आणला आहे. भोईर यांचं हेलिकॉप्टर येण्यास अद्याप अवधी असला तरी त्यापूर्वीच त्यांची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे. 

bhiwandi Farmer janardan bhoir Bought 30 cr helicopter vadape village

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT