Dombivali News: भिवंडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी टिटवाळा येथे महागणपतीची आरती करत प्रचारास सुरवात केली.
यावेळी त्यांनी विरोधी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना स्वतःचे काँक्रीट दाखवा असा सवाल करत विकास कामांवरून पाटील यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.
रविवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रे हे टिटवाळा येथे आले होते. शिवसेना ठाकरे गटाकडून म्हात्रे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर म्हात्रे यांनी महागणपतीच्या मंदिरात जात आरती करत गणेशाचे दर्शन घेतले. तसेच महाविकास आघाडीच्या विजयासाठी गणरायाला साकडे देखील घातले.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे मंत्री कपिल पाटील व राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर होण्याआधी पासूनच भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना ते समोरासमोर येऊन लढण्याचे आव्हान देत होते.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही उमेदवाराकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर होतात त्यांच्या गोदामांवर कारवाई करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याचे बोलले जात आहे. मात्र या कारवाईला आपण घाबरत नाही असे म्हणत म्हात्रे यांनी विरोधकांना उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
रविवारी युतीचे उमेदवार पाटील हे बदलापूर येथे प्रचारासाठी आले होते. मात्र यांच्या गोदामावर झालेल्या कारवाईचा ठपका त्यांनी विरोधी पक्षावर लावत त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे विधान केले होते.
यावर उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले, मी केंद्राचा मंत्री आहे. राज्याच्या एखाद्या विषयावर आदेश देण्याचा अधिकार मला नाही. हे देखील एखाद्याला माहीत नसेल तर मी काय करू शकतो. माझ्या पायाखालची वाळू सरकली, असे म्हात्रे म्हणतात.
मी तुम्हाला सांगतो मी ज्या काँक्रिटीकरणवर उभा आहे, त्या काँक्रीटला मजबूत करण्याच काम माझ्या पाठीशी असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि आमचे राज्याचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, राष्ट्रवादी अध्यक्ष सुनील तटकरे या लोकांनी केलं आहे.
त्यांनी बनविलेल्या काँक्रिटीवर मी उभा आहे. मी काय रेतीवर उभा नाही माझ्या पायाखालची वाळू सरकायाला. हे काँक्रीट मिश्रण मोदीजीनी ताकतीने बनवल आहे. यावर आरडीएक्स बॉम्ब टाकला तरी सुद्धा ते सरकणार नाही, एवढ मजबूत काँक्रीटकरण वर मी उभा आहे. असे सांगत पाटील यांनी म्हात्रे यांना टोला लागवला होता.
सुरेश म्हात्रे (बाळया मामा ) यांनी उत्तर देत सांगितले की तुम्ही दुसऱ्यांच्या काँक्रीटवर किती वेळ उभे राहणार? तुमचे काँक्रीट सांगा ना मला? पंतप्रधान मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेता...तुम्हाला येथे लढायच आहे. तुम्हाला येथे दहा वर्ष मतदारांनी निवडून दिलं आहे. तुम्ही किती वेळा यांच्या त्यांच्या आशीर्वादाने मत मागणार ? असा सवाल उपस्थित करत पाटील यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आणि सांगितले की पाटील यांनी समोरासमोर लढाव, पाठीमागुन वार करू नये असा सल्लाही दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.