मुंबई

Bhiwandi Loksabha: माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न; गोदामावर कारवाई झाल्यानंतर सुरेश म्हात्रे यांचा मोठा आरोप

जिनके घर शिशेके होते है ओ दुसरे के घर पर पत्थर नहीं फेका करते; भिवंडीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांचा कपिल पाटलांवर पलटवार

शर्मिला वाळुंज

Bhiwandi News: भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (loksabha bhiwandi News)

एकीकडे उमेदवारी जाहीर झाले आणि दुसरीकडे मात्रे यांच्या गोदामावर एमएमआरडीए कडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या माध्यमातून मात्रे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे. यावेळी जिनके घर शिशे के होते है वो दुसरे के घर पर पत्थर नहीं फेका करते असे म्हणत म्हात्रे यांनी भाजप खासदार कपिल पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. (maharashtra political news)

भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली. म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या गोदामांवर एमएमआरडीए कडून कारवाई करण्यात आली.

आर. के. लॉजी पार्क येथील गोदाम बांधकामांवर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीए पुढे सरसावली आहे. संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल व उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतले आहेत असे स्पष्टीकरण सुरेश म्हात्रे यांनी दिले आहे.

म्हात्रे म्हणाले, मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून 90 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यात अनाधिकृत गोदाम व्यवसाय करणारे आणि भ्रष्ट्राचाराची जननी कपिल पाटील हेच आहेत.

एमएमआरडीए राजकीय दबावातून कारवाई करत आहे.

जिनके घर शिशेके होते है वो दुसरे के घर पर पत्थर नहीं फेका करते असे म्हणत सुरेश म्हात्रे यांनी भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्या वर पलटवार केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North: काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार बदलला, मधुरीमाराजेंना उमेदवारी

Shivsena Candidate List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर! १५ जणांच्या नावांचा समावेश, दोन जागा मित्रपक्षांना; शायना एनसी यांना उमेदवारी

Pradip Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं बंड! शिवसेनेचा आदेश डावलून पत्नीचा अपक्ष अर्ज भरणार

Chetna Pagydyala : १६ वर्षीय चेतनाने मोडला मिताली राजचा विक्रम; १९७३ सालचा पराक्रमही उध्वस्त, संघाचा ऐतिहासिक विजय

Video Viral: ''शिंदेंनी फसवलं, उद्धव ठाकरेच आमच्यासाठी देव'' उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले; अन्नही सोडलं

SCROLL FOR NEXT