मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंवर आरोप असलेल्या भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एसीबीनं चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी तक्रारदार असलेल्या अंजली दमानिया यांचे वकिल असीम सरोदेंनी तशी लेखी मागणी न्यायालयात केली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही या प्रकरणात चौकशी होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बैठकीतील सगळे पुरावे मिनीट्स ऑफ मिटिंग रद्द करण्याचे फडणवीसांनी आदेश दिले होते, असा गभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. याबाबत 23 फेब्रुवारीला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत वाढ होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एकनाथ खडसे यांच्या भूखंड घोटाळा प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मदत केल्याचा संशय व्यक्त करत फडणवीस यांची देखील अँटी करप्शन ब्युरोने चौकशी करावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. शिवाय या भूखंड घोटाळा प्रकरणात तब्बल दहा तत्कालीन अधिकारी आणि मंत्र्यांची नावं दमानिया यांनी दिली असल्याचे कळत आहे.
Bhosari land Scam case Investigate Devendra Fadnavis Anjali Damania demand
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.