Chagan bhujbal esakal
मुंबई

ओबीसी आरक्षणात भाजपकडूनच अडथळे; भुजबळांचा आरोप

ओबीसींचा इम्पेरिकल डेटा लवकरात लवकर मिळावा अशी मागणी मागासवर्गीय आयोगाकडे केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ओबीसींचा इम्पेरिकल डेटा लवकरात लवकर मिळावा अशी मागणी मागासवर्गीय आयोगाकडे केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी दिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य मागास आयोगाची भेट घेतली. त्यात आपण वरील मागणी केल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. तसेच कोर्टात टिकेल असा डेट तयार करण्याची आयोगाला विनंती केली असल्याचेही यावेळी भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, ओबीसी आरक्षणासाठी भाजपकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोपही यावेळी भुजबळ यांनी केला आहे. (Chagan Bhujbal On OBC Reservation)

या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीदेखील बैठक पार पडल्याचे ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर यावेळी चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याची वेळ जर आलीच तर, भाजपाप्रमाणित ओबीसी जागेवर ओबीसी उमेदवार देऊ असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले. भाजपच्या राहुल वाघ यांचा विरोध असून, त्यांनाही याबाबत विनंती करणार असून, वाघ यांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना विनंती करणार असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

भाजपचा विधीमंडळात पाठिंबा आणि कोर्टात विरोध

दरम्यान, ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा (BJP) विधीमंडळात पाठिंबा आहे. मात्र कोर्टात विरोध असल्याचे ते म्हणाले. राहुल वाघ आणि विकास गवळी यासारखे लोक आरक्षणात अडथळे येतील असे कृत्य करत असून, त्यांनीच या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल करून संपूर्ण प्रक्रिया लांबवली असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले. त्यामुळे एकीकडे विरोधी पक्ष म्हणून ओबीसी आरक्षणासाठी पाठींबा द्यायचा आणि दुसरीकडे पक्षाच्यात पदाधिकाऱ्यांनी या विरोधात याचिका दाखल करायची हे योग्य नसून, असे करणे म्हणजे असे करणे म्हणजे भाजपचा दुहेरी डाव असल्याचेही भुजबळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT