Shiv Mandir Corridor sakal
मुंबई

Shiv Mandir Corridor : शिवमंदिर कॉरिडॉर प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह योगगुरू रामदेव बाबा, अयोध्येचे महंत गोविंदगिरी महाराज उपस्थित राहणार! 'शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल'चीही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार सांगता!

सकाळ वृत्तसेवा

अंबरनाथ : अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसर विकासप्रकल्पाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह योगगुरू रामदेव बाबा, अयोध्येचे महंत गोविंदगिरी महाराज हेदेखील उपस्थित राहणार आहेत. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या विकासप्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल'चीही सांगता होईल.

अंबरनाथमधील शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असून जागृत देवस्थान अशी या मंदिराची ओळख आहे. या मंदिराच्या परिसराचा उज्जैनच्या महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी मोठा पाठपुरावा केला होता. यानंतर राज्य शासनाने या प्रकल्पासाठी १३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यातून मंदिर परिसराचा विकास केला जाणार आहे.

यामध्ये प्रवेशद्वार, सर्कल आणि नंदी, पार्किंग प्लाझा, प्रदर्शन केंद्र, अँपीथिएटर, अंतर्गत दगडी रस्ते, भक्तनिवास, संरक्षक भिंत, घाट, खेळाचे मैदान आणि स्वच्छतागृहे अशी कामे केली जाणार आहेत. या कामांचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पतंजली योगपीठाचे बाबा रामदेव तसेच अयोध्येचे महंत गोविंदगिरी महाराज व अन्य मान्यवरही उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

'शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल'ची आज सांगता!

अंबरनाथच्या शिवमंदिराची ओळख जगभरात व्हावी, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ७ वर्षांपासून 'शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल'चे आयोजन केले जाते. या फेस्टिव्हलमध्ये जागतिक दर्जाच्या कलाकारांची कला अनुभवण्याची पर्वणी अंबरनाथकरांना मिळते. यंदा २९ फेब्रुवारीपासून या फेस्टिव्हलला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी गायिका मैथिली ठाकूर, दुसऱ्या दिवशी गायक अभिजित भट्टाचार्य आणि साधना सरगम, तिसऱ्या दिवशी गायक कैलास खेर यांनी आपली कला सादर केली आहे.

तर आज अखेरच्या दिवशी गायक सोनू निगम आपली कला सादर करणार असून यानंतर फेस्टिव्हलची सांगता होणार आहे. आज या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार असून अंबरनाथकरांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.

- मोहिनी जाधव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT