Palghar shivsena ravindra patil Uddhav Thackeray  sakal
मुंबई

Shivsena: ठाकरेंना मोठा धक्का; जिल्हाप्रमुखा विरोधात गुन्हा दाखल; अवैध धंद्यांविरोधात उठवला होता आवाज

Big blow to Uddhav Thackeray case has been filed against the district head of Palghar ravindra patil

सकाळ वृत्तसेवा

Uddhav Thackeray: शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पालघर जिल्हा प्रमुख राजेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविकास आघाडी मधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गुरुवारी सकाळी राजेंद्र पाटील यांच्यावर मनोर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 385,500 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित वाढवण बंदराच्या पर्यावरणीय जनसुनावणी विरोधाची भूमिका घेतल्याने गुन्हा दाखल केल्याची शक्यता राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.

तर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.जनसुनावणीला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटावर बदबाव निर्माण करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.पोलिसांच्या टायमिंगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल झाल्याने पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

पालघर जिल्ह्यातील अवैद्य धंदे करणाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने एक खाजगी इसम पैसे गोळा करीत असल्याचा आरोप करीत राजेंद्र पाटील यांनी खाजगी इसमासह अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पत्र दिले होते.

.खाजगी इसमाने न्यायालयामार्फत राजेंद्र पाटील आणि दोन पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार मनोर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केल्याची माहिती मनोर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिवरकर यांनी दिली.

शुक्रवारी पालघरच्या जिल्हा क्रीडा संकुलात होणाऱ्या वाढवण बंदराच्या जनसुनावणीला शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचा विरोध असल्याची भूमिका जिल्हा प्रमुख राजेंद्र पाटील यांनी जाहीर केली होती.शिवसेना भूमिपुत्रांसोबत असल्याचे पत्र जाहीर केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT