मुंबई

गर्भवती कोरोनाबाधित असेल तर 'हा' आहे मोठा धोका! ऑक्सफर्डच्या अंतस्त्रावशास्त्र शाखेचा अभ्यास, काळजी घेण्याचे आवाहन 

भाग्यश्री भुवड

मुंबई  : कोरोनाग्रस्त लहान मुले, वयोवृद्ध, तरुणांच्या रक्तात गुठळ्या होऊन त्यातून गंभीर परिणाम आणि मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले होते. असा अभ्यास पालिका रुग्णालयांमध्ये ही केला गेला. मात्र, अश्याच पद्धतीने कोरोनाबाधित गर्भवती महिलांमध्ये ही रक्तात गुठळ्या होण्याचा धोका असू शकतो असे निरीक्षण ऑक्सफर्डच्या अंतस्त्रावशास्त्र शाखेच्या अभ्यास अहवालात म्हटले आहे. त्यामुळे, गर्भवतींनी कोरोना काळात विशेष काळजी घेतली पाहिजे असे आवाहन ही करण्यात आले आहे. 

कोरोनाबाधित गर्भवतींमध्ये हार्मोन्सच्या बदलांमुळे आणि गर्भधारणे दरम्यान सुरु असलेल्या औषधोपचारांमुळे गुंतागूंत निर्माण होऊ शकते. त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होऊन त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो असे ही या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, या अहवालाबाबत मुंबईतील स्त्रीरोगतद्यांनी दुजोरा दिला आहे.  कोरोनाच्या संसर्गात सर्वात जास्त परिणाम रक्तवाहीन्यांच्या आतील भागात इजा होते आणि त्यातून रक्ताच्या गाठी तयार होतात. ही गाठ शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकते. पण, जर मेंदु आणि हृदयात जाऊन बसली की रुग्णाचा आकस्मिक मृत्यू ही होतो. त्यामुळे, अश्या रुग्णांना हे ब्लड थिनर्स इंजेक्शन देण्यात येते. या काळात 3 ते 9 महिन्यांच्या गर्भवतींनी काळजी घेतली पाहिजे असे ही सांगण्यात आले आहे.

कोरोनाग्रस्त गर्भवतींना रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. कारण, गर्भधारणेत हायपर कोग्लेटीवी असते. आणि कोरोनातही हायपर कोग्लेटीवी असते. प्रसूतीच्या वेळेस रक्तस्त्राव जास्त होऊ नये म्हणून निसर्गाने तसे नियोजन केले आहे. त्यामुळे, नैसर्गिकरीत्या रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते. यावर अभ्यास होणे गरजेचे आहे. 

डॉ. अशोक आनंदे,
स्त्रीरोगतद्य, जे जे रुग्णालय

गर्भवतींनी घरी राहण्याचे आवाहन - 
दरम्यान, अजुन तरी मुंबईत अश्या प्रकारच्या केसेस आढळल्या नसुन प्रसूती झाल्यानंतर त्या नॉर्मल दिसतात. शिवाय, त्यांना कोणत्याच प्रकारची गुंतागूंत दिसत नाही. गर्भवतींमध्ये नैसर्गिक हार्मोनल प्रोटेक्शन असते. त्यामुळे, कोरोनाग्रस्त महिलांमध्ये ही जास्त अडथळे येत नसल्याचे नायर रुग्णालयाच्या रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या नोडल ऑफिसर डॉ. सारिका चपाणे यांनी सांगितले आहे. 

कोरोना विषाणूचा धोका गर्भवतींना असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे या काळात श्वास घेण्यासाठी होणारा त्रास आणि कमी अधिक प्रमाणात बदलणार रक्तदाब या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळे ते हायरिस्क असतात आणि त्यांच्यात अश्या पध्दतीने रक्ताच्या गुठळ्या भीती जास्त असू शकते अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर हा फुफ्फुसावर परिणाम करतो तसेच रक्तवाहिन्यांमध्ये इजा होऊन रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात. मुळतः गरोदरपणात हायपकोग्लेबिलिटी मुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या दिसून येते. याचे कारण असे की गरोदरपणात अंतर्गत हार्मोन्स वाढत असतात. मात्र, हल्ली विविध आजारपणामुळेही गर्भवती महिलांमध्ये रक्ताच्या गुठळ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे, गर्भपात होणे, बाळाची वाढ न होणे, गर्भवती स्त्रियांना धोका निर्माण झाल्याचे दिसून येते. गर्भवती महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला तर त्यामुळे गुंतागुत निर्माण होऊ शकते. कारण, हा संसर्ग फफ्फुसे तसेच रक्ताच्या पातळीवर विपरीत परिणाम करणारा ठरतो. अशा प्रकारचे आजार असणा-यांनी ब्लड थिनर्स सारख्या पर्यायांचा वापर करावा तसेच गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.

-    डॉ गिरीजा वाघ,
स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालय

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT