मोसमातील पहिल्याच पावसात मुंबईतील शहरातील काही भागांत पाणी साचून लोकांचे हाल झाले. यामुद्द्यावर उद्धव ठाकरे गट आणि राज्य सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. काल गटरी तुंबल्या आणि रस्त्यांवर पाणी साचल्याच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रशासनास लक्ष केले. तसेच नालेसफाई झाली नसल्याचा आरोप देकील केला. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या आरोपांनंतर भाजपकडून आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका करण्यात आली आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी कालच्या आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची व्हिडीओ क्लिप शेअर करत एक ट्वीट केलं आहे. या व्हिडीओ मध्ये आदित्य ठाकरे पावसाबद्दल बोलत आहेत, ज्यामध्ये त्यांनी आमच्या वेळी 400 एमएम - 300 एमएम प्रतितास पाऊस होत होता तेव्हा मी, महापैर किंवा उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरुन लोकांचे प्रश्न सोडवत होतो असा दावा करताना दिसता आहेत. भाजपकडून आदित्या ठाकरेंच्या याच विधानची खिल्ली शेलारांनी उडवली आहे.
या ट्वीटमध्ये त्यांनी "तमाशामधील आबुराव आणि बाबुराव एकापेक्षा एक फेकम फाक करुन मनोरंजन करतात... उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत. काल मातोश्रीच्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली..." असं म्हटलं आहे.
"म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला 400 mm पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले. मुंबईत एका तासात 400 mm? कधी एवढा पाऊस पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? मुंबईत 26 जुलै 2005 ला पण एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता. यांची फेकंम् फाक तर त्या आबुराव, बाबुरावपेक्षा ही भयंकर!"
"मुंबईकर हो, दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना...इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन वो काग़ज़ कि कश्ती, वो बारिश का पानी!" असेही शेलाप म्हणाले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.