Ulhasnagar Fireing: भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या वादामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला गेला असल्याची बाब निदर्शनास येत आहे.
सध्याच्या घडीला महेश यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर आमदार गायकवाड यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. शहरात एकीकडे तणावपूर्ण शांतता असताना समाज माध्यमांवर मात्र दोन्ही पक्षांकडून शीतयुद्ध छेडले जात आहे.
दोघांच्या समर्थकांकडून आपल्या नेत्यांना सपोर्ट करणारे रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत. टायगर अभी जिंदा है असे म्हणत शिंदे गटाकडून महेश यांना पाठींबा दिला जात आहे तर शिवरायांनीच सांगितले आहे, दगाबाजांना माफी नाही असे म्हणत आमदार गायकवाड यांना त्यांच्या समर्थकांकडून पाठिंबा दिला जात आहे.
द्वारली येथील जमिनीच्या वादातून भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.
सध्याच्या घडीला गणपत गायकवाड व त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून कळवा येथे त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. तर महेश व त्यांचा साथीदार राहूल पाटील याच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी सकाळी कल्याण लोकसभेचे खासदार व मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपूत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महेश यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. महेश गायकवाड हे खासदार शिंदे यांचे निकटवर्तीय असून ते त्यांच्या तब्येतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
कल्याण पूर्वेत आमदार गायकवाड व शहरप्रमुख गायकवाड यांचे कार्यालय समोरासमोर असून तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे शहरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण पहायला मिळत आहे.
एकीकडे शहरात शांतता राखली जात असताना सोशल मिडीयावर मात्र दोन्ही पक्षाच्या समर्थकांकडून शीतयुद्ध छेडले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते, समर्थक सोशल मिडीयावर रिल्स, स्टेट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना पाठिंबा देणारे रिल्स, स्टेट्स त्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत. एकमेकांना आव्हान, प्रतिआव्हान देणारे हे रिल्स असून यामुळे समाज माध्यमावरील वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
पक्षातील वरीष्ठांकडून कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र कार्यकर्ते असे रिल्स, स्टेट्स ठेवून आपली ताकद दाखवून देत असून सोशल मिडीयावर हा कोल्ड वॉर आता सुरु झाला असल्याचे दिसून येत आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.