Uddhav-Thackeray-Ajit-Pawar File Photo
मुंबई

"शिवसेनेचा संगत-गुण राष्ट्रवादीला लागला की काय..."

भाजपच्या केशव उपाध्येंची बोचरी टीका

विराज भागवत

राज्याच्या राजकारणात सध्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरूद्ध भाजप (BJP) असा सामना रंगला आहे. राज्यात कोरोनाविरूद्ध (Coronavirus) सुरू असलेल्या उपाययोजना पुरेशा नसल्याचे मत भाजप नेते व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील लॉकडाउनमुळे (Lockdown) रूग्णसंख्या आटोक्यात आल्याचा दावा महाविकास आघाडी करताना दिसत आहे. याचदरम्यान, जालना जिल्ह्याला नियोजित कोट्यापेक्षा जास्त लसीचा पुरवठा करण्यात आल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आलं होतं. त्यावरून केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर निशाणा साधला. (BJP Keshav Upadhye Slams NCP Rajesh Tope over covid19 Vaccine Supply to Jalna)

"शिवसेनेचा संगत-गुण राष्ट्रवादीला लागला का कोण जाणे? पण राजेश टोपे यांनी जालन्यात जास्त लस दिल्याबद्दल खुलासा मागितला, त्यावर जयंत पाटील यांनी बोलायला हवे. वास्तव माहिती लपवून पंतप्रधानांकडून कौतुक केल्याचा दावा करताना मनाचा ‘आतला आवाज’ तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा", अशी टीका त्यांनी केली.

"स्वत:चा उदोउदो करत फिरायचं, आगा ना पिछा बोलत रहायचं, अपयश आल की केंद्रावर ठकलायचं... ही या राज्य सरकारची त्रिसूत्री, सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमलं, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचं! कोरोना कमी झाला की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आणि वाढला की जनतेचा निष्काळजीपणा! एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती? आता घरीबसल्या मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं, सारखं पंतप्रधानानी यांच कौतुक केले, याचा नवा खेळ खेळला जातोय", अशी बोचरी टीका त्यांनी केली.

"मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता पंतप्रधान मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही आणि हे सांगतं कोण, तर मुख्यमंत्री कार्यालयाची प्रेसनोट! आता प्रत्येक बाबतीत PR agency वापरू नका, हेच तर देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रात म्हटले आहे, मग इतकं झोंबलं का? इथे बिचारे नितीन राऊत असोत की पृथ्वीराज चव्हान, बाळासाहेब थोरात असोत, अजून त्यांच्या पत्राचीही कुणी दखल घेत नाही तरी सचिन सावंत मात्र ‘बेगाने शादी में….’ नाचत राहतात. फडणवीस यांच्या पत्राचा ‘लगता है निशाना सही जगह लगा है", असा टोलाही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: भारताला एकच विमान मिळेना, संपूर्ण संघाला एकत्र जाता येईना! BCCI चा जुगाड, रोहित शर्मा...

Kalyan East Assembly Election : विरोधी पक्षांकडून वोट जिहादचा नारा दिला जातोय; भाजपा नेता स्मृती इराणी यांचा आरोप

Ulhasnagar News : उल्हासनगरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त सचिन गोरे ॲक्शन मोडमध्ये; 18 गुंड केले तडीपार

Sambhaji Raje Chhatrapati: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु केवळ जिजामाता, संभाजीराजे छत्रपतींचे अमित शहांना उत्तर!

Amit Deshmukh : महाविकास आघाडीला लोकसभेपेक्षा अधिक कौल; अमित देशमुख यांचा विश्वास

SCROLL FOR NEXT