Mahavikas-Aghadi-Ministers E-Sakal
मुंबई

ठाकरे सरकारचा आणखी एक मंत्री गोत्यात? विशेष टीम करणार तपास

कोण आहेत ते मंत्री? नक्की काय आहे प्रकरण?

विराज भागवत

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वीच सीबीआय (CBI) आणि ED (enforcement directorate) गुन्हा दाखल केला. अनिल देशमुख यांच्यासाठी हा एक धक्काच आहे. त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांनंतर शिवसेनेचे आमदार अनिल परब यांचा नंबर लागणार असा इशारा देणारे वक्तव्य केले होते. त्यातच, आता सोमय्यांनी अनिल परबांविरोधात तक्रार केली असून पर्यावरण मंत्रालयाची एक विशेष टीम या प्रकरणाचा तपास करण्यासाठी येणार आहे. (BJP Kirit Somaiya Demands Probe for Shivsena Anil Parab 10 crore Konkan Resort Special Team to Investigate)

"राज्यातील मंत्री आणि शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी कोकणातील दापोलीमध्ये कोरोनाकाळात १० कोटी रूपांचे बेकायदेशीरपणे साई रिसॉर्ट उभारलं आहे. या बांधकामात पर्यावरणासंबंधित काही गोष्टींचे पालन करण्यात आलेले नाही. तसेच आर्थिक दृष्ट्यादेखील कायद्याचा भंग करण्यात आल्याचं दिसत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून विशेष टीम पाठवली जाईल असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. तसेच, हे १० कोटी कुठून आले याचाही तपास व्हायला हवा, यासाठी मी CBI, ED, आयकर विभाग या सर्वांकडे तक्रारी केल्या आहेत. त्याच्याही तपास केला जाईल", अशी माहिती सोमय्या यांनी व्हिडीओ ट्वीट करून दिली.

काय आहे नक्की प्रकरण

अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी दापोलीमध्ये कोट्यवधी रुपयांची जागा घेतली असून माहिती अधिकार कायद्यान्वये आपण याबाबतची माहिती मिळविली आहे आणि लवकरच याचा आपण लवकरच गौप्यस्फोट करणार आहोत, अशी माहिती भाजप नेते सोमय्या यांनी दिली होती. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी २०२१ मध्ये स्वत:च्या नावाने या जमिनीचा साठे करार केला आहे, मात्र तो रजिस्टर केलेला नाही. डिसेंबर २०२० मध्ये ती जागा त्यांनी अंतर्गतरित्या त्यांचे भागीदार सदा कदम यांना विकली, असे दाखविण्यात आले. त्यामुळे कागदोपत्री अनिल परब यांनी जागा खरेदी केली असे दिसत नाही. त्या जागेवर अनिल परब आणि त्यांचे भागीदार सदानंद कदम यांनी रिसॉर्ट उभे केले आहे. तेथे जाण्यासाठी वनविभागाच्या जमिनीतून रस्ता काढला आहे. त्यासाठी परब यांनी पदाचा गैरवापर केला आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT