Kirit Somaiya on Jarendeshwar Sugar Factory  sakal media
मुंबई

श्री जरंडेश्वर साखर कारखाना मूळ संचालकांना परत द्या; सोमय्या यांची ईडीकडे मागणी

कृष्ण जोशी

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) टाच आणलेला जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना (Jarandeshwar Sugar Mills) मूळ संचालकांना परत द्यावा, अशी मागणी भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी आज सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडे केली. यासंदर्भात त्यांनी आज दुपारी माजी संचालकांसह ईडीच्या बॅलार्ड पियर येथील विभागीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली व ही मागणी केली. तशा आशयाचे लेखी निवेदनही (Written letter) त्यांच्यातर्फे ईडीला देण्यात आले. आपण कारखान्याच्या सत्तावीस हजार सभासदांमार्फत ही मागणी करत आहोत असेही त्यांनी सांगितले. ईडीने हा कारखाना अंतिमतः जप्त करून त्याचा ताबा घेतल्यावर तो आम्हाला चालविण्यासाठी द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

चिमणगाव येथील हा कारखाना ईडी च्या ताब्यात आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कर्ज थकल्याने हा कारखाना गुरू कमोडिटी सर्विसेस यांना विकण्यात आला होता. मात्र हा विक्री व्यवहार बेकायदा असल्याचा दावा करून सभासदांच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आले होते. मागील वर्षी जुलै महिन्यात ईडी ने कारखान्याचा हंगामी ताबा घेतला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने आदेश देताना हा कारखाना ईडीने ताब्यात घ्यावा असा आदेश दिला होता.

आता हा कारखाना ईडी ने ताब्यात घेतल्यावर तो पुन्हा सभासदांना चालवण्यासाठी द्यावा. सदस्यांनी अनेक वर्षे संघर्ष व कष्ट करून हा कारखाना उभारला आहे. त्यामुळे शेतकरी, सभासद व कर्मचारी यांच्या हितासाठी कारखाना चालू राहणे गरजेचे आहे. सदस्यांना व संचालकांना कारखाना चालवण्याचा अनुभव असल्यामुळे कारखाना आमच्या ताब्यात द्यावा, असे लेखी निवेदनही यावेळी देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

SCROLL FOR NEXT