Kirit-Somaiya 
मुंबई

'तुला घराबाहेर पडू देणार नाही', सोमय्यांना धमकी

काय म्हटलय या धमकीच्या संदेशात

दीनानाथ परब

मुंबई: भाजपाचे नेते (BJP leader) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना धमकी (threat message) मिळाली आहे. या संदर्भात त्यांनी मुलुंडचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना पत्र पाठवून, आवश्यक ती पावलं उचलण्याची विनंती केली आहे. किरीट सोमय्या हे नेहमीच चर्चेत असतात. नेहमीच वेगवेगळ्या मुद्यांवरुन त्यांची सत्ताधारी पक्षाविरोधात आंदोलने सुरु असतात. (BJP leader Kirit Somaiya received threat message on whats app)

किरीट सोमय्या हे माजी खासदार आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या प्रखर विरोधामुळे ईशान्य मुंबईतून तिकीट मिळू शकले नव्हते. त्यांच्याजागी मनोज कोटक यांना तिकिट मिळाले व त्यांनी निवडणूक जिंकली. किरीट सोमय्या यांना आता धमकी मिळाली आहे.

दोन दिवसांपूर्वी १३ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास व्हॉट्स अॅपवर त्यांना एक मेसेज आला. हा मेसेज मराठीमध्ये होता. '१ जून नंतर तुला घराबाहेर पडू देणार नाही, काय करतो बघ. मुलुंडला येऊन सांगतो तुला' असा तो संदेश होता. हा धमकीचा संदेश पाठवणारा माणूस कोण आहे? ते मी शोधू शकलो नाही. त्यामुळे आरोपीला शोधून काढण्यासाठी जे आवश्यक आहे, ते सर्व करा असे किरीट सोमय्या यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांनी सध्या महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार मोहिम उघडली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरण लावून धरण्यासाठी ते ओळखले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

SCROLL FOR NEXT