मुंबई: शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी महाविकास आघाडीच्या सरकारनं द्यावी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध सरकारनं पावलं उचलावी म्हणून आज भाजपनं राज्यभरात धरणं आंदोलन केलं. मुंबईच्या आझाद मैदानावरही भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. यात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर चांगलीच आगपाखड केली आहे. यात त्यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या लग्नावरूनही खोचक टोला लगावलाय.
काय म्हणाले मुनगंटीवार:
"ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार आहे. आम्ही घेतलेल्या सर्व निर्णयांना हे सरकार स्थगिती देत आहे. जर आदित्य ठाकरे यांच्याकडून लग्नाचा प्रस्ताव आला तर हे सरकार त्या प्रस्तावालाही स्थगिती देईल," असा खोचक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे सरकारला लागवलाय. "अबकी बार बाप-बेटे की सरकार" असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटलंय. "काही लोकं स्वत:च्याच मंत्रीपदाचं आणि खात्याचं कौतुक करत बसतात" असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावलाय.
हे तर गझनीचे ही बाप:
"या सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र सरकारला या सगळ्याचा विसर पडला आहे. त्यामुळे हे सरकार फक्त 'गजनी' नाही तर गजनीचा बाप आहे. ही आता शिवसेना राहिलेली नाही ही 'सोनिया-सेना' झाली आहे", असंही मुनगंटीवारांनी म्हंटलं आहे.
मुनगंटीवारांच्या या टिकेवर अजूनही उद्धव ठाकरे किंवा ठाकरे सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. आता महाविकास आघाडीकडून या टीकेवर काय प्रतिक्रिया येतात हेच बघणं महत्वाचं असणार आहे.
BJP Leader Mungantiwar criticizes shivsena on Aditya thackeray's marriage
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.