मुंबई

'उशीरा सूचलेले शहानपण'! मंदिरं खुली करण्याच्या निर्णयावर भाजप नेत्याची प्रतिक्रीया

तुषार सोनवणे

मुंबई - पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. अनेक दिवासांपासून मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याविषयी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांंनी राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत परवानगी दिल्यानंतर, विरोधी पक्षानेही त्याचे स्वागत केले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर आंदोलने केली होती. भाजप अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनीदेखील आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारकडून लवकरच मंदिरे उघडण्याबाबत निर्णय होईल असे सांगितले जात होते,. आता अखेर सरकारने हा निर्णय घेतला आहे. याविषयी दरेकर म्हटले की, '' राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागतच आहे. परंतू हे उशीरा सूचलेले शहानपण होय. मंदिरे खुली केल्याने, पूजारी, मंदिरांवर अवलंबून असलेले छोटे व्यवसायीक, अन्य किरकोळ दुकानदार इत्यादींना नक्कीच दिलासा मिळणार आहे. ''

खरे तर हा निर्णय आधीच होणे अपेक्षित होते त्याला विलंब करण्याचे काहीच कारण नव्हते. कारण एका बाजूला वाईन शॉप, बीयरबार, शॉपिंग मॉल, बाजार, सार्वजनिक वाहतूक सुरू झाली असताना मंदिरे किंवा प्रार्थनास्थळे का बंद आहेत. असा सातत्याने सवाल नागरिकांकडून केला जात होते. यासाठी महाराष्ट्रातील साधू संतांचे आंदोलन, वारकरी संप्रदायाची मागणी, भाजपने हिंदूत्वाच्या भूमिकेतून मंदिरे खुली करण्याची केलेली मागणी. या दबावातून सरकारने अखेर निर्णय घेतला आहे. असेही दरेकर यावेळी म्हणाले.

सोमवार पासून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली होणार

पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणालेत की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.

हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रींची इच्छा

या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा.

हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील असं ही मुख्यमंत्री म्हणालेत. 

BJP leaders reaction to the decision to open the temple
----------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SCROLL FOR NEXT