मुंबई

'आयत्या बिळावर नागोबा', ठाकरेंचा निषेध; भाजप आमदाराला अटक

"मेट्रो प्रकल्पाची बर्बादी करणारे मुख्यमंत्री कोणत्या अधिकाराने उद्घाटनाची चमकोगिरी करतायत?"

विराज भागवत

"मेट्रो प्रकल्पाची बर्बादी करणारे मुख्यमंत्री कोणत्या अधिकाराने उद्घाटनाची चमकोगिरी करतायत?"

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महाविकास आघाडीचे मंत्री बाळासाहेब थोरात, असलम शेख, नवाब मलिक (Nawab Malik), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर सोमवारी मेट्रो 2A आणि Line 7 च्या मार्गावरील ट्रायल रनला सुरूवात झाली. हा प्रकल्प जानेवारी २०२२पर्यंत जनसामान्यांच्या सेवेत हजर असेल असं बोललं जात आहे. त्यादरम्यान, या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे आणि मंत्री आले असताना भाजप आमदार अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) यांनी त्यांना काळा झेंडे (Black Flags) दाखवले आणि सरकारचा निषेध केला. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आकुर्ली स्टेशनबाहेर भातखळकर आणि भाजप कार्यकर्त्यांना अटक (Arrest) केली. (BJP MLA Atul Bhatkhalkar arrested by Mumbai Police after protesting against CM Uddhav Thackeray)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कष्टाने पुढे नेलेल्या मेट्रो प्रकल्पावर अहंकाराचा वरवंटा फिरवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मिरवत या प्रकल्पाच्या उद्घटनाला आले. त्यांच्या विरोधात निदर्शने करणारे मुंबई भाजपा प्रभारी आमदार अतुल भातखळकर आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली, अशी माहिती भाजप महाराष्ट्रच्या ट्वीटर अकाऊंटवरून देण्यात आली.

अतुल भातखळकर यांनीही स्वत: ट्वीट करून आपला रोष व्यक्त केला आणि अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला. 'अहंकार आणि बालहट्टापायी लाखो मुंबईकरांचे स्वप्न असलेल्या मुंबई मेट्रोचा बट्ट्याबोळ करून फुकटचे श्रेय घेण्यासाठी धडपडणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध आज आम्ही तीव्र आंदोलन केले. आकुर्ली मेट्रो स्थानकाबाहेर पोलिसांनी आम्हाला अटक केली. चमको मुख्यमंत्र्यांचा तीव्र निषेध. आयत्या बिळावर नागोबा... अहंकारापोटी मेट्रो प्रकल्पाचा खुळखुळा करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फुकटेपणाचा धिक्कार, अशी ट्विट्स करत त्यांनी आपला राग व्यक्त केला.

मेट्रो प्रकल्पाची बर्बादी करणारे मुख्यमंत्री कोणत्या अधिकाराने उद्घाटनाची चमकोगिरी करतायत? हा प्रकल्प रखडवल्याबद्दल त्यांनी मुंबईकरांची माफी मागायला हवी. परंतु कोरोनाच्या काळात न केलेल्या कामाची ते जाहिरातबाजी करतायत.मेट्रोचा खेळखंडोबा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात मुंबई भाजपाची निर्दशने. ट्रायल रनच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी माझ्या नेतृत्त्वाखाली आकुर्ली स्थानकाबाहेर निषेध आंदोलन. कोरोना संकटकाळात जाहिरातबाजीतून जनतेच्या पैशाचा चुराडा कशासाठी?, असा सवालही भातखळकर यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT