मुंबई: कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता होळी आणि रंगपंचमी या सणावर राज्य सरकारनं निर्बंध आणले आहेत. होळी आणि रंगपंचमी साजरी करण्याबद्दल नियमावली जारी करण्यात आली आहे. सरकारनं घातलेल्या या निर्बंधावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. एकीकडे होळीवर बंदी, दुसरीकडे शब-ए-बारात ला परवानगी' अशा हिंदु विरोधी ठाकरे सरकारचा जाहीर निषेध करायला पाहिजे, अशा शब्दांत अतुल भातखळकर यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसंच मुंबईत कोरोनाचे नियम पाळून प्रत्येकानं होळी साजरी करावी, असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे.
शब-ए-बारात ला नियमांसह परवानगी पण होळीच्या सणावर कडक निर्बंध, ठाकरे सरकारच्या या हिंदू विरोधी फतव्याला भारतीय जनता पार्टीचा पूर्ण विरोध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईतील हिंदू बांधवांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत आपापल्या श्रद्धेनुसार होळी साजरी करावी, असे आवाहनही अतुल भातखळकर यांनी केले आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे कारण पुढे करत हिंदू सणांवर निर्बंध लादणाऱ्या ठाकरे सरकारने इतर धर्मियांच्या उत्सवांना मात्र खुली सूट दिली आहे. ठाकरे सरकारच्या अशा हिंदू विरोधी कृत्यांचा जाहीर निषेध करून आम्ही होळी साजरी करणारचं, ठाकरे सरकारमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी आमच्यावर कारवाई करून दाखवावी, असं खुलं आव्हान सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे.
भाजप प्रवक्ते राम कदम यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हिंदू विरोधी ठाकरे सरकार म्हणतेय होळी घराच्या दारा समोर पेटवायची नाही. तर मग काय घरात पेटवायची?, असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
राम कदम यांनी ट्विट करुन सरकारच्या या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. लोक रंगपंचमी समजू शकतात गर्दी होईल. एकमेकांना स्पर्श होईल मात्र नियमांचे पालन करत होळी पेटवली आणि हिंदू बांधवांनी आपला सण साजरा केला तर त्याला ठाकरे सरकारचा विरोध का?, असा संतप्त सवालही राम कदम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
हेही वाचा- नवाब मलिक यांचा सरकारला घरचा आहेर, गृहमंत्र्यांना दिला सल्ला
सत्तेत आल्यापासून सातत्याने हिंदू धर्म आणि हिंदू सण यांना विरोध का ?,हा प्रश्नही त्यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. अन्य धर्मांना तातडीने परवानगी दिली जाते ते काय कोविडचे नातेवाईक लागतात काय? , असंही ते म्हणालेत.
BJP mla atul bhatkhalkar criticizes Thackeray government over strict Holi rules mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.