bjp mla ganpat gaikwad greet mns raju patil for loksabha election politics Sakal
मुंबई

Loksabha Election : भाजप आमदारांच्या मनसे आमदाराला लोकसभेसाठी शुभेच्छा!

आमचे उमेदवार शिंदेच... पण पाटलांना शुभेच्छा; भाजप आमदार गणपत गायकवाड

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चिले जात असतानाच त्यांनी स्वतःच खासदार श्रीकांत शिंदे हेच पुढील युतीचे उमेदवार असतील असे जाहीर करून टाकले. यामुळे भाजप आणि शिंदे गटातील वाद काहीसा क्षमलेला असताना मनसे कार्यकर्त्यांनी आमदार राजू पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असा उल्लेख असलेला केक कापला आहे.

यामुळे आमदार पाटील हे लोकसभेसाठी उत्सुक आहेत अशी चर्चा सुरू असतानाच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांना शुभेच्छा देऊ केल्या आहेत. आमचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे असतील राजू पाटलांनी जर कंबर कसली असेल तर त्यांना शुभेच्छा असे आमदार गायकवाड म्हणाले आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि शिंदे गटात उघड उघड वाद सुरू आहेत. त्यातच कल्याण लोकसभेवर भाजप दावा करणार असल्याची चर्चा देखील जोरदार सुरू होती.

यासाठी आमदार रवींद्र चव्हाण तसेच संजय केळकर यांचे नाव चर्चिले जात होते. आमदार रवींद्र चव्हाण व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फारसे पटत नसल्याने भाजप आणि शिंदे गट वादाची चर्चा कायम चर्चिली जात होती. राष्ट्रवादीचे शरद गटाचे नेते रोहित पवार या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता वर्तवली होती.

यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र या वादावर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पडदा टाकत कल्याण लोकसभेची जागा ही खासदार श्रीकांत शिंदे हेच लढवतील असे जाहीर करून टाकले.

यामुळे हा वाद काहीसा क्षमला असे बोलले जात असतानाच, मनसे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा येथील त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी भावी खासदार असा उल्लेख असलेला केक आणत त्यांचे स्वागत केले होते. आमदार पाटील यांनी देखील हा केक कापून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला होता.

यामुळे मनसेचे आमदार पाटील हे देखील लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का ? याची चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तर दुसरीकडे मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे याचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधातच दंड थोपटले कां असा सवाल यानिमित्ताने उपस्थिती केला जात आहे.

मध्यंतरी खासदार श्रीकांत शिंदे हे विकास कामांसाठी सहकार्य करीत नसल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी करत मनसे आमदार पाटील यांची बाजू घेतली होती. कल्याण लोकसभेसाठी राजू पाटील यांच्या नावाची चर्चा होते याविषयी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले,

आमचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे हेच असतील. परंतु राजू पाटील यांनी जर कंबर कसली असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. तिकीट कोणाला द्यायचं हे पक्षातील वरिष्ठ ठरवतील. आमचा पक्ष आणि आम्ही एकत्रच आहोत आणि आम्ही एकत्र काम करू असे देखील आमदार गायकवाड यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT