Ulhasnagar Firing News:
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या खासगी अंगरक्षकाने कल्याण शहर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी कल्याण पूर्व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या खासगी अंगरक्षकाने शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्या.
यामध्ये महेश गायकवाड यांना दोन गोळ्या लागल्या आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान गणपत गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं-
उल्हासनगरमध्ये राजकीय राडा झाला आहे. हिल लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झाला. पोलीस निरीक्षक केबिनमध्ये हा गोळीबार झाला आहे. भाजप आमदार आणि शिंदे गटाच्या माजी नगरसेवकामध्ये राडा झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्या राडा झाला. (Thane Crime News)
यामध्ये गणपत गायकवाड यांच्या अंगरक्षकाने गोळीबार केला असून महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडण्यात आल्या. या दोघांमध्ये फार जुना वाद होता. हा वाद मिटवण्यासाठी हे दोघे हिल लाईन पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी कार्यकर्ते, अंगरक्षक देखील होते.
मात्र पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्या बाचाबाची झाली. यावेळी गणपत गायकवाड यांच्या खासगीअंगरक्षकाने आपली बंदूक काढली आणि ६ गोळ्या झाडल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षकासमोरच ह्या गोळ्या झाडल्या. (Ulhasnagar Firing News)
दोन गोळ्या महेश गायकवाड यांना लागल्या तर दोन गोळ्या अंगरक्षकांना लागल्या, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. सध्या महेश गायकवाड यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.