Badlapur School Crime esakal
मुंबई

Badlapur School Crime : ''बदलापूरमध्ये ठरवून केलेली राजकीय स्टंटबाजी'' भाजप आमदाराची मुक्ताफळे, नेमकं काय म्हणाले?

Badlapur Crime News: बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवर भाजप आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनंतर संताप व्यक्त होतोय. कथोरे म्हणाले की, घडलेली घटना दुर्दैवी आहे. परंतु सुरु असलेलं आंदोलन भरकटलं आहे. शाळा सोडून लोक रेल्वेकडे वळले. जे आंदोलक ट्रॅकवर आंदोलन करत आहेत ते बदलापूरचे नसून बाहेरुन आलेले आहेत.

संतोष कानडे

MLA Kisan Kathore: बदलापूरमध्ये एका बालविद्यालयात दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. बदलापूरमध्ये तर लोक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला तातडीने फासावर लटकवा, अशी मागणी आंदोलकांची आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात बसलेले आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवर भाजप आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनंतर संताप व्यक्त होतोय. कथोरे म्हणाले की, घडलेली घटना दुर्दैवी आहे. परंतु सुरु असलेलं आंदोलन भरकटलं आहे. शाळा सोडून लोक रेल्वेकडे वळले. जे आंदोलक ट्रॅकवर आंदोलन करत आहेत ते बदलापूरचे नसून बाहेरुन आलेले आहेत.

आमदार कथोरे पुढे म्हणाले की, लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शाळा प्रशासनावर कारवाई करण्यात आलेली असून संस्थाचालकाची चौकशी होणार आहे. आंदोलकांनी रेल्वे ट्रॅक अडवून बदलापूरकरांना वेठीस धरलंय. आंदोलन बघून ही ठरवून केलेली स्टंटबाजी असल्याचं कथोरे म्हणाले.

''बदलापूरच्या प्रकरणामध्ये राजकारण करु नये, बाहेरुन आलेल्या लोकांनी रात्रीतून बॅनर तयार करुन लावले. लाडकी बहीण योजनेवरुन तयार केलेले बॅनर म्हणजे राजकारणाचा भाग आहे.. हे उल्हासनगरमधून आले आहेत.'' असा आरोप कथोरे यांनी आंदोलकांना उद्देशून केला.

दरम्यान, बदलापूरमध्ये नागरिक आंदोलनावर ठाम असून त्यांना पोलीस अधिकारी समाजावून सांगण्याचा आणि आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत.

आंदोलकांना आवाहन करताना पोलिस म्हणाले की, या घटनेची प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त हजर आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपींचा खटला आपण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवणार आहोत. त्यासाठी सरकारी वकिलांची नेमणूकही करण्यात येणार आहे. इतकं सांगूनही नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे यावर ते ठाम असून 'वुई वॉन्ट जस्टिस' अशी घोषणाबाजी आंदोलक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT