BJP MLA Ravindra Chavan who came to inspect the Mumbai-Goa highway got stuck in a traffic jam  
मुंबई

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था! पाहणीसाठी आलेले भाजपचे मंत्रीच अडकले वाहतूककोंडीत

रोहित कणसे

Mumbai - Goa Highway News : मुंबई महामार्गावरील खड्ड्यांचा मुद्दा मागील काही दिवसांपासून प्रचंड गाजत आहे. यदारम्यान या महाार्गाची पाहणी करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हेच वाहतूक कोंडीत अडकल्याचे पाहायला मिळाले. अखेर त्यांचा ताफा महामार्गाच्या विरूद्ध दिशेने काढत रस्ता काढण्यात आला.

रविंद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची सातत्याने पाहाणी करण्यात येत आहे. आज सकाळी देखील रविंद्र चव्हाण य़ांचा गोवा-मुंबई महामार्गाच्या कामाचा पाहणी दौरा होता. मात्र महामार्गावरील कामाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मंत्री महोदयांनाच आता वाहतूक कोडींचा फटका सहन करावा लागला. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

१५ हजार कोटींचा खर्च करून देखील मुंबई गोवा महामार्ह पूर्ण झालेला नाहीये. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना सतत मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेच्या मुद्द्यावर विरोधकांकडून सतत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जातो.

यादरम्यान सार्वजनिक बांधकांम मंत्री रविंद्र चव्हाण हे या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले असताना रस्त्यावर एसटी बंद पडल्याने झालेल्या वाहतूक कोंडीत ते अडकले. शेवटी चव्हाण यांनी रस्त्यावर उतरत वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला.

आता या प्रकारानंतर सर्वसामान्यांना अशा वाहतूक कोंडीचा किती त्रास सहन करावा लागतो याचा अंदाज त्यांना आला असेल असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT