मुंबई

Mumbai BJP: मुंबई भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस, त्या बॅनरची होत आहे जोरदार चर्चा!

सकाळ वृत्तसेवा

Latest Mumbai news: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भारतीय जनता पक्षातील अंतर्गत वाद समोर येऊ लागले आहेत. आमदार पराग अळवणी यांच्या मतदारसंघातच भाजप कार्यकर्ते संजय उपाध्याय यांचे बॅनर झळकल्याने या वादाला तोंड फुटले आहे.

लोकसभा निवडणुकीत विलेपार्ले मतदारसंघात प्रतिकूल परिस्थितीत असताना भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांना आमदार पराग अळवणी यांनी ५१ हजाराचे मताधिक्य मिळवून दिले होते. त्यांच्या लोकप्रियतेला भाजप कार्यकर्ते संजय उपाध्याय यांनी आव्हान देणे सुरु झाले आहे. उपाध्याय यांनी नुकतेच त्यांनी सेवालय नावाचे जनसंपर्क कार्यालय उघडले आहे.

तसेच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणारे मोठे फलक लावले होते. त्यामुळे अळवणी यांच्या विरोधात एक गट सक्रिय असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, घाटकोपर परिसरात प्रकाश मेहता यांना आव्हान देणाऱ्यांना उमेदवारी दिली गेली होती. आता पराग शहा की प्रकाश मेहता असा प्रश्न आहे. राम कदम यांच्या मतदारसंघातही बंडाच्या चर्चेमुळे नुकत्याच झालेल्या दौऱ्यातही अमित शहा यांनी मुंबईतील गटबाजीवर बोट ठेवले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''पीएम केअर फंडातला घोटाळा ७० हजार कोटींच्या घोटाळ्याला लाजवेल एवढा मोठा'' उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

कारखानदारांनी 'हे' सिद्ध केल्यास 5 तोळे सोने, 1 लाख, एक कार देऊ अन् त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू; 'स्वाभिमानी'चं चॅलेंज

Shrirampur Crime : लिफ्ट घेतली, मैत्री झाली अन् जीवही गमावला,तरुणाच्या खुनाचा श्रीरामपूर पोलिसांनी लावला तपास

Latest Maharashtra News Updates : 'योजना जाहीर करत सुटलेयत, पण अंमलबजावणी नाही' - उद्धव ठाकरे

Tata Group: टाटा समूह मोठी कंपनी विकणार? एअरटेल खरेदी करणार कंपनीतील हिस्सा; ग्राहकांना काय फायदा होणार?

SCROLL FOR NEXT