मुंबई महापालिकेची निवडणूक जशी जवळ येत आहे. तश्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
मुंबई : महापालिकेची निवडणूक जशी जवळ येत आहे. तश्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता भाजप मेळाव्यात आशिष शेलारांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय. फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू होती है असं म्हणत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेला (Shiv Sena) डिवचलंय.
मुंबईत आज भाजपा (BJP) कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. शेलार पुढं म्हणाले, 'मुंबई महापालिकेचं (Mumbai Municipality) बजेट 45 हजार कोटींचं आहे. पण, त्याच शिवसेनेनं काय केलं. देशातल्या सात राज्यांचं बजेट मुंबईपेक्षा कमी आहे. पण, सुविधा काय दिल्यात? शिवसेनेनं फक्त भ्रष्टाचार दिलाय.
मुंबईला मेट्रो देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिली, कोस्टल रोडची मुहुर्तमेढ फडणवीसांनी रोवली, मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारनं निधी दिला. मुंबईतील ५२ पूल नितीन गडकरींनी बांधले असं म्हणत मुंबईच्या विकासात भाजपचा मोठा वाटा असल्याचं शेलारांनी सांगितलं. दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. मुंबई महापालिकेत मागील निवडणुकीत शिवसेनाचा महापौर बसवण्यात आला.. पण त्या वेळी भाजपचा महापौर होऊ शकला असता, पण मित्र पक्षासाठी आपण दोन पावलं मागे गेलो आणि त्यांना महापौर बनवू दिला. पण, आता मात्र आपलाच महापौर मुंबई महापालिकेवर बसेल, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला. यावर आता शिवसेनेची कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.