ठाणे, ता. २३ (वार्ताहर) : लोकशाहीचा उत्सव सोमवारी (ता.२०) शांततेत पार पडला; मात्र निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष आणि नेत्यांमध्ये वाद झाले, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. दुसरीकडे राजकारणाचा स्तर घसरत चालला होता. मात्र हा तणाव सोमवारी मतदानानंतर संपला. एक दुसऱ्यावरच्या आरोपाचे युद्ध संपले, त्यामुळे आता पुन्हा मैत्रीपूर्ण वातावरण व्हावे, यासाठी ठाण्यातील भाजप पदाधिकारी महेश कदम यांनी ठाण्यातील विविध पक्षांच्या नेत्यांना एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. ‘झाले इलेक्शन... जपा रिलेशन’ असा संदेश देणारे होर्डिंग ठाणेकरांचे आकर्षण ठरले आहे.
ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी महेश कदम यांनी हे होर्डिंग लावले आहे. संस्कृतीचे शहर म्हणून राज्यात ठाण्याची ओळख आहे; मात्र मागील काही वर्षांत राजकारणाचा स्तर खालावलेला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे चार पक्ष झाले आहेत. तीन पक्षांची आघाडी आणि तीन पक्षांची महायुती झाली. त्यामुळे वर्षानुवर्ष मित्र असलेले हे वैरी झाले आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत मित्रांनीच मित्रांवर चिखलफेक करण्याची परिस्थिती उद्भवली. त्यामुळे मने दुखावली. त्यामुळे राजकीय विरोध-वितुष्ट संपुष्टात यावे, यासाठी महेश कदम यांनी होर्डिंगच्या माध्यमातून स्पष्ट करीत मैत्रीचा सल्ला दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.