Hitendra Thakur Sakal
मुंबई

Hitendra Thakur : ठेकेदारांकडून 20-20 कोटी रुपये जमा करण्याचे भाजपचे आदेश; हितेंद्र ठाकूर यांचा गौप्यस्फोट

संदीप पंडित

विरार : वसई-विरार, डहाणू, पालघर व विक्रमगड या भागातील ठेकेदारांकडून भाजपने 20-20 कोटी रुपये जमा करण्यासाठी सांगितले आहे. त्यासाठी वसई-विरार महापालिकेतील अधिकाऱ्यांची एका विशेष जागी बैठक घेऊन त्यांना हे पैसे जमा करून देण्यास सांगितले आहे, असा गौप्यस्फोट बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुजन विकास आघाडीला बेडकाची उपमा देत त्यांना आम्ही वसई-विरारमध्येच निपटवू, अशी बोचरी टीका केली होती. या टीकेला जशास तसे उत्तर मंगळवार, 15 मे रोजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विरार येथील पत्रकार परिषदेतून दिले.

त्या वेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही खळबळजनक माहिती जनतेसमोर आणली. २०-२० कोटी इतके पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर, अशी कोणती कामे या भागात सुरू आहेत? असा प्रतिप्रश्नही आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यानिमित्ताने केला आहे.कामे करा; अथवा नका करू, तुमची बिले निघतील,

असे सांगून प्रत्येक ठेकेरादाकडून 20 कोटी रुपये घेतले जात असल्याचे आमदार हितेंद्र ठाकूर म्हणाले. गरज वाटल्यास फन हॉटेलची मागील 15 दिवसांची सीसीटीव्ही फुटेजेस तपासा. कोण आले, कोण गेले हे आपल्या लक्षात येईल.

कदाचित ही फुटेजीस उडवलीही गेली असतील. पण काल मला वसई-विरार महापालिकेतील एका अधिकाऱ्याचा फोन आला होता. त्यांना 20 कोटी जमा करून देण्यास सांगण्यात आले असल्याचे हा अधिकारी म्हणाला,

अशी माहिती ठाकूर यांनी देऊन एकच खळबळ उडवून दिली. तेव्हा आम्हाला निपटून टाकण्याची भाषा करू नका. त्याऐवजी तुमच्या पालकमंत्र्यांना आवरा. नाही तर आम्हीच तुम्हाला निपटवून टाकू, असा सज्जड दम आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

भाजप जिल्ह्यात दबावाचे राजकारण करत आहे. एका महिला गटविकास अधिकाऱ्याने कमळ हे चिन्ह नाही लावले तर यांनी तिच्या निलंबनाचे आदेश काढले. अशाच प्रकारे यांनी तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, वसई-विरार महापालिका आणि अन्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपल्या प्रचाराला जुंपले आहे, अशा संतप्त शब्दांत ठाकूर यांनी भाजपविरोधातला आपला राग व्यक्त केला.

दरम्यान; वसई-विरारमध्ये निपटून टाकू. हा काय गाजर-मुळा आहे का? शेर की खाल पेहनके... अशी भाषा त्यांनी केली. अरे इथे शेरच आहेत. खरं तर वसईमध्ये निपटून टाकू म्हणणे हा समस्त वसई-विरारकरांचा अपमान आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधत; बापाचे राज्य आहे का? हिंमत असेल तर इज्जतीत लढा, असे आव्हान आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT