maratha reservation E-Sakal
मुंबई

"...म्हणून मराठा बांधवांना ठाकरे सरकारची चिड"

भाजपचे प्रवीण दरेकर महाविकास आघाडी सरकारविरोधात पुन्हा आक्रमक

विराज भागवत

भाजपचे प्रवीण दरेकर महाविकास आघाडी सरकारविरोधात पुन्हा आक्रमक

मुंबई: राज्यातील मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून सध्या राजकारण पेटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण रद्द (Cancelation) करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच दिला. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय खडाजंगी (Political Fight) पाहायला मिळाली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा 'फुलप्रूफ' नव्हता, असा आरोप सध्या महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) केला जात आहे. तर ठाकरे सरकार (Uddhav Thackeray Govt) आरक्षणाबाबतची राज्याची बाजू सुप्रीम कोर्टात मांडण्यास कमी पडले असा आरोप भाजपकडून (BJP) केला जात आहे. या मुद्द्यावर भाजपचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सडेतोड मत व्यक्त केल. तसेच, भाजप मराठा समाजासोबतच असल्याचा पुनरूच्चार केला. (BJP Pravin Darekar Slams Mahavikas Aghadi Govt Extends support to Maratha Reservation)

"मराठा आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली. या नेत्यांनी मराठा आरक्षणाचे तीन-तेरा वाजवले. नेत्यांच्या अशा वागणुकीमुळे मराठा बांधवांमध्ये चिड आणि असंतोष आहे. त्यामुळे मराठा समाजाला आधार देण्याचे काम भारतीय जनता पार्टी करणार आहे", असे त्यांनी सांगितले. "देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक कमिटी नेमली आहे. ही कमिटी या प्रकरणाचा अभ्यास करेल आणि पुढील कार्यप्रणालीचा आराखडा तयार करेल. त्यानंतर एक मार्गदर्शक कमिटी तयार केली जाईल. त्यात देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आणि भाजपचे इतर महत्त्वाचे नेते असतील. या कमिटीद्वारे सखोल चर्चा करून मराठा आरक्षणाबाबतची दिशा स्पष्ट करण्यात येईल", अशी माहिती त्यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे की भाजप मराठा समाजासोबत आहे. त्यांच्या आंदोलनात आम्ही पक्ष बाजूला ठेऊन, कोणताही झेंडा न घेता सामील होवू. या सहभागात केवळ मराठा समाजाला निर्मळ मनाने पाठबळ देण्याचाच विचार असेल. कोणत्याही राजकीय उद्देशाने हे आंदोलन केले जाणार आहे. उपेक्षित मराठा समाजाला योग्य दिशेने मार्गदर्शन करून त्यांना पाठिंबा दिला जाईल, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT