मुंबई : सरकार कोरोनासाठी आवश्यक औषधं उपलब्ध असल्याचा दावा करत असलं तरी आजही या औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. त्यामुळे टॉसिलीझुमब यासारख्या औषधांचा काळाबाजार सुरू असून चढ्या किंमतीला ही औषधं विकली जात आहेत. एफडीने कारवाई करत औषधांचा काळाआबाजार करणारे रॅकेट उद्धस्त केले आहे. कोरोना संबंधी औषधांची काळाबाजारी करणा-यांवर एफडीएने कारवाईला सुरूवात केली आहे. आझम खाल नावाचा व्यक्ती अशाच प्रकारे टॉसिलीझुमब औषधांच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहीती FDA ला मिळीली होती. त्यानुसार FDA ने ने क्राईम ब्रांचच्या मदतीने आझम खानची धरपकड करून रॅकेट उध्वस्त केले.
आझम खान हा काशीपुर उत्तराखंड येथईल रहिवाशी आहे. तो टॉसिलीझुमब औषधं विकण्यासाठी मुंबईत आला होता. या औषधाची किंमत 40,000 रूपये इतकी आहे. मात्र आझम खान हे औषध 1 लाख रूपयांना विकत होता. त्याकडून 15 इंजेक्शन जप्त करण्यात आल्या आहेत. ही औषधं त्याने दिल्लीच्या बाजारातून आणली असल्याचे स्पष्ट झाले.
देशातील सर्वाधित कोरोनाबाधीत रूग्ण मुंबईत आहेत. त्यामुळे कोरोना उपचारांसाठी गुणकारी ठरलेल्या औषधांना मोठी मागणी आहे. वाढत्या मागणीमुळे औषधांच्या काळाबाजारीला ऊत आला आहे. त्यामुळे केवळ राज्यातच नाही तर आसपासच्या राज्यातून देखील छुप्या पद्धतीने औषधं आणून त्याचा काळाजाबार सुरू कऱण्यात आला आहे.
महत्त्वाची बातमी - चुकूनही जाळ्यात 'हे' दुर्मिळ मासे दिसलेत तर मच्छिमार अडकतील कारवाईच्या जाळ्यात...
एफडीए आणि क्राईम ब्रांच युनिट 9 ने संयुक्तपणे ही करावाई केली. आझम खान याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अशा पद्धतीने जर कोणी औषधांची काळाबाजारी करून रूग्णांची लुट करत असेल तर त्याची माहीती कळवण्याचे आवाहन एफडीएने केले आहे.
( संपादन - सुमित बागुल )
black marketing of Actemra tocilizumab injection and its delhi connection
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.