पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 येथे पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात चोळई आणि धामणदिवी गावांच्या सीमेवर एका वळणावर डोंगर फोडण्यासाठी भूसुरुंगाचे स्फोट करण्यात आले. या स्फोटामुळे संपूर्ण परिसराला हादरे बसले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्ता चौपदरीकरण कामासाठी हे स्फोट केल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : मुंबईकर कुडकुडणार!
मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरपासून अडीच किलोमीटरवर रस्त्याच्या चौपदरीकरण कामासाठी मंगळवारी सायंकाळी डोंगर फोडण्यासाठी एल ऍण्ड टी कंपनीकडून गाव हद्दीत मोठ्या क्षमतेचे भूसुरुंग स्फोट करण्यात आले. या स्फोटांमुळे घरांना तडे गेले. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलादपूर तहसीलदार दीप्ती देसाई यांना माहिती दिली. तहसीलदार देसाई व तलाठी खेडकर यांनी घटनास्थळी पाहणी करून 17 घरांचे पंचनामे केले.
महत्वाची बातमी : वाशी ते घाटकोपर प्रवास गारेगार!
यावेळी शेकाप पोलादपूर तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड यांनी सांगितले की, पोकलेनसारख्या यंत्राचा वापर करून डोंगर फोडणे शक्य होते. तरीही एल ऍण्ड टी कंपनीकडून कठीण खडक नसतानाही सुरुंगाचा स्फोट करण्यात आला.
या घटनेत नुकसान झालेल्या ग्रामस्थांना तातडीने नुकसानभरपाई मिळण्याची मागणी त्यांनी केली. तहसीलदार दीप्ती देसाई यांनी एल अँड टी कंपनीकडून भविष्यात रॉकब्रेकर यंत्राचा वापर करून भुसुरुंगाचे स्फोट टाळावेत, असे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.