cancer sakal
मुंबई

ब्लड कॅन्सरवर उपचारासाठी आयआयटी मुंबईची CAR-T सेल उपचार पद्धती

आयआयटी मुंबईने भारतात पहिली वहिली अशी स्वदेशी बनावटीची CAR-T सेल उपचार पद्धती विकसित केली आहे. लिम्फोमा या ब्लड कॅन्सरवर उपचारासाठी ही पद्धती महत्वाची ठरणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

आयआयटी मुंबईने भारतात पहिली वहिली अशी स्वदेशी बनावटीची CAR-T सेल उपचार पद्धती विकसित केली आहे. लिम्फोमा या ब्लड कॅन्सरवर उपचारासाठी ही पद्धती महत्वाची ठरणार आहे.

मुंबई - आयआयटी मुंबईने भारतात पहिली वहिली अशी स्वदेशी बनावटीची CAR-T सेल उपचार पद्धती विकसित केली आहे. लिम्फोमा या ब्लड कॅन्सरवर उपचारासाठी ही पद्धती महत्वाची ठरणार आहे. या चाचणीच्या पहिल्या टप्प्यातील आकडेवारी आणि परिणाम समोर आले आहेत. आयआयटी मुंबई आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने ही चाचणी पार पाडली गेली. या चाचणीत उपचार करण्यात आलेले सर्व रूग्ण सुरक्षित असल्याचे चाचणीत आढळले आहे.

टाटा मेमोरिअल हॉस्पिटल येथे चाचणीचा पहिला टप्पा पार पडला. या चाचणीसाठी वापरण्यात आलेले HCAR19 या उत्पादनाची निर्मिती आयआयटी मुंबईने केली. या पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी या उत्पादनाचा वापर करण्यात आला. या चाचणीसाठी दहा रूग्णांची निवड गेल्या वर्षभरात करण्यात आली. त्यापैकी सर्व प्रौढ अशा सहा रूग्णांवर HCAR19 उपकरणाचा वापर करून उपचार करण्यात आले. या चाचणीमध्ये अतिशय सकारात्मक असे निकाल समोर आले आहेत. या उपचारादरम्यान कोणत्याही रूग्णाला आयसीयूची गरज भासली नाही. तर उपचारादरम्यान कोणत्याही व्यक्तीला मृत्यू झाला नाही. लिम्फोमा या आजारासाठीच्या क्लिनिकल ट्रायल्स अतिशय सकारात्मक आढळल्या आहेत.

या चाचणीत कोणत्याही रूग्णावर उपचाराचे दुष्परिणाम झालेले नाहीत. तर ४० टक्के रूग्णांमध्ये सायटोकाईन रिलिज सिंड्रोम आढळला आहे. दहापैकी तीन रूग्णांनी CART-T सेल थेरपीला चांगला प्रतिसाद दिला आहे. आयआयटी मुंबईचे सहयोगी प्राध्यापक डॉ राहुल पुरवार यांनी CAR-T प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. तर patented anti-CD19 CAR-T (HCAR19) हे उत्पादन विकसित करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईने टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या मदतीने हे उत्पादन विकसित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT