मुंबई

BMC भ्रष्ट्राचाराचा मोठा अड्डा; शिवसेनेच्या अनेक भ्रष्ट नेत्यांची चौकशी करा

तुषार सोनवणे

मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात आज ईडीने छापा पाडला. त्यानंतर त्यांच्या पुत्राला विहंग सरनाईकला ईडी कार्यालयात नेण्यात आले. याप्रकरणी महाविकास आघाडी आणि भाजपनेत्यांमध्ये राजकीय टीका टिप्पणी सुरू झाली आहे. परंतु कॉंग्रेस नेते संजय निरूपम यांनी शिवसेनेवर सडकून टीका करीत मुंबई महानगरपालिका भ्रष्ट्राचाराचा अड्डा असल्याचे म्हटले आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी कारवाईचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. शिवसेनेकडून याला तीव्र भाषेत उत्तर दिले जात आहे. तर त्यांच्याच जोडीला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे नेतेही याप्रकरणी भाजपवर निशाणा साधत आहेत. परंतु कॉंग्रेसनेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप लावले आहेत. 

संजय निरुपम यांनी ट्विट केले आहे त्यात ते ्म्हणतात की, ईडी किंवा कोणतीही चौकशी संस्था राजकीय हेतूने प्रेरित कारवाई करीत असेल तर त्याचा विरोध झालाच पाहिजे. परंतु हे ही एक मोठे सत्य आहे की, शिवसेनेच्या नेत्यांनी गेल्या दशकभरापासून मोठे भ्रष्ट्राचार केले, अवैध संपत्ती गोळा केली, तर त्याची कोणीतरी चौकशी करायलाच हवी. प्रताप सरनाईकांनी काय काय घोटाळे केले हे चौकशीनंतर कळेलच परंतु त्यांच्यासारखे असे अनेक शिवसेनेचे नेते आहेत. ज्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार केला आहे.या सर्वांची चौकशी झालीच पाहिजे. या चौकशीला राजकीय द्वेश किंवा प्रेरित कारवाई म्हणून टाळता कामा नये. बाळासाहेब ठाकरे नेहमीच कॉंग्रेसवर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावत असत परंतु त्यांनी आपल्याच आजूबाजूच्या नेत्यांच्या भ्रष्ट्राचारावर अंकूश ठेवला नाही. 

मुंबई महानगर पालिका देखील शिवसेनेच्या भ्रष्ट्राचाराचा मोठा अड्डा असून त्यातून शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या तुंबड्या भरल्या आहेत. या सर्व घोटाळे आणि भ्रष्ट्राचाऱ्यांची चौकशीतर व्हायलाच हवी. जर सरनाईकांचीही चौकशी राजकीय हेतून प्रेरित नसेल तर अशा चौकशीला कोणाचीही हरकत असता कामा नये. असेही गंभीर आरोप संजय निरूपम यांनी केले आहे. आता निरूपम यांच्या आरोपांना शिवसेनेकडून काय उत्तर दिले जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

--------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT