BMC Budget : आज 4 फेब्रुवारीला बृहन्मुंबई महागरपालिका 2023-2024 वर्षाचं आर्थिक बजेट सादर करणार आहे. या आर्थिक बजेटकडे सर्वांच लक्ष लागलय. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईचे बजेटही तितकेच उच्च दर्जाचे असते.
पण तुम्हाला माहिती आहे का मुंबई ही फक्त देशाचीच आर्थिक राजधानी नाही तर याशिवाय बृहन्मुंबई आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (BMC Budget 2023 Mumbai richest corporation in Asia read story)
बृहन्मुंबई आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका
बीएमसीचं बजेट हे अफगाणिस्तानाच्या GDP पेक्षाही जास्त आहे. बृहन्मुंबईला आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते. याचं कारण म्हणजे 2022 मध्ये बीएमसी कडून 45,949 कोटींच बजेट सादर करण्यात आलं. विशेष म्हणजे हे बजेट 2021 च्या बजेटपेक्षा 6900 कोटी रुपयांनी जास्त होतं.
बीएमसी कडे किती फिक्स डिपोजिट फंड आहे?
बीएमसी कडे 92,000 कोटींचा फिक्स डिपोजिट फंड आहे. या फंडवरुन तुम्ही अंदाज लावू शकता की बीएमसीचं बजेट किती दमदार राहणार आहे. त्यामुळे या बजेटकडे सर्वसामान्यांपासून ते मोठ मोठ्या व्यावसायिकांचं याकडे लक्ष असणार आहे.
आज बीएमसीचं बजेट
आज बीएमसीचं बजेट असून या बजेटमध्ये कोस्टल रोड, वर्सोवा-दहीसर लिंक रोड, खड्डे मुक्त मुंबई हे या वर्षीच्या बजेटचे महत्त्वाचे मुद्दे असतील. बीएमसीचे कमिश्नर आय.एस.चहल यंदाचं बजेट सादर करणार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.