मुंबई

मुंबईत लोकल सेवा सुरु होणार?, पालिका आयुक्तांनी घातली 'ही' अट

पूजा विचारे

मुंबईः कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबई शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जाताहेत. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात मुंबईची लोकल सेवा पूर्णपणे ठप्प होती. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठीही लोकल सेवा कधी सुरु केली जाणार, असा सवाल वारंवार उपस्थित केला जात आहे. या प्रश्नावर आता महापालिका आयुक्तांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. 

मुंबईतील रुग्णवाढ थांबली, तरच मुंबई लोकल पुन्हा सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु करणार असल्याचं महत्त्वपूर्ण वक्तव्य महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केलं आहे.  संपूर्ण मुंबई अनलॉक करायला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

मुंबई अनलॉक करण्याबरोरबच लोकल सेवाही सुरू करण्यास आम्ही तयार आहोत. एमएमआर क्षेत्रातील करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यास आम्ही लॉकडाऊन कधीही उठवू शकतो, असं चहल यांनी सांगितलं.

मुंबई शहरात नोकरी करणारे बहुसंख्य कर्मचारी मुंबईतील उपनगरे किंवा वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली अशा एमएमआर भागात राहतात. मात्र मुंबईसोबतच या भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. त्यामुळे मुंबईच्या महानगरी क्षेत्रातील रुग्णवाढ थांबवणं खूप गरजेचं आहे, अन्यथा संसर्ग वाढत राहील, असंही इक्बाल चहल म्हणाले.

गेल्या दोन महिन्यात मुंबईत दर दिवशी सरासरी १७०० पेक्षा रुग्ण वाढलेले नाहीत. त्यामुळे आम्ही मुंबई अनलॉक करू शकतो.  मुंबईचा रुग्णवाढीचा दर हा केवळ एक टक्का आहे. पण एमएमआर क्षेत्रात रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईप्रमाणेच एमएमआरची रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यास रुग्णवाढीचा दर ६४ दिवसांवर येईल. त्यामुळे आपण लोकल ट्रेनही सुरू करू शकतो, असं चहल म्हणाले.

मुंबईत रेल्वे सुरू झाली असून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना या लोकलमधून प्रवास करण्याची मुभा आहे. तसेच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. 

मुंबईची लोकसंख्या २० मिलियन आहे. त्यामुळे शहरात किमान २०० हॉस्पिटल आणि बेड्सची दिवसाला गरज आहे. पूर्वी पेक्षा मुंबईची स्थिती आता बरीच चांगली आहे. एमएमआर क्षेत्राची लोकसंख्या दोन कोटी आहे. त्यामुळे एकदा का लोकल सुरू केली तर रेल्वेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल. कल्याण आणि नालासोपाऱ्याहून मोठ्या प्रमाणावर लोक येतील. त्यामुळे एमएमआर क्षेत्रातील परिस्थिती नियंत्रणात आली तर मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व काही सुरू करण्याची विनंती करेल, असं आयुक्त चहल म्हणालेत.

bmc commissioner iqbal singh chahal mumbai local train service will be resume soon

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT