Mumbai  sakal
मुंबई

BMC:मुंबईकरांच्या नागरी सुविधांची कामे वेगाने मार्गी! पालिका आयुक्तांची ध्वजारोहण समारंभात माहिती

यावेळी पालिका आयुक्त चहल बोलत होते. माझी माती, माझा देश' या या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

BMC Development Work: कोस्टल रोड वरळी कोळीवाड्याचा प्रश्नांची सोडवणूक, आपला दवाखान्यात बारा लाख लोकांवर उपचार, शालेय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता मिशन अभियान, रस्त्याचे काँक्रिटीकरण आधी नागरी सुविधांची भरीव कामे वेगाने मार्गी लावल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण समारंभाच्या वेळी बोलताना दिली.

पालिका मुख्यालयात आयुक्त चहल यांच्या हस्ते पालिका मुख्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी पालिका आयुक्त चहल बोलत होते. माझी माती, माझा देश' या या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणाले.

मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' याअंतर्गत एकूण प्रस्तावित २५० पैकी १३९ आपला दवाखाना, २४ पॉली क्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र उभारली असून उर्वरित ८२ डिसेंबर २०२३ पर्यंत कार्यरत होतील, अशी ग्वाही पालिका आयुक्त चहल यांनी दिली. (Latest Marathi News)

आर्थिक साक्षरता मिशन

पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा भविष्यात आर्थिक स्तर उंचावण्यासाठी 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिटयुट लिमिटेड' यांच्या सहयोगाने 'आर्थिक साक्षरता मिशन' उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.(Latest Marathi News)

कोस्टल रोड साठी नवीन जागा उपलब्ध

कोस्टल रोड प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईत भरणी करुन ९६.५१ हेक्टर नवीन जमीन उपलब्ध होणार आहे. त्यापैकी सुमारे ७० हेक्टर जागा लँडस्केपींग, प्रोमेनेड, सायकल ट्रॅक, जॉगिंग पार्क इत्यादी सुविधांसाठी उपलब्ध असेल.

कोळी बांधवांचा प्रश्न मार्गी

वरळी कोळीवाडयातील मच्छीमार समुदाय वांद्रे वरळी सागरी सेतुला जोडणाऱ्या पुलाच्या दोन खांबांमध्ये २०० मीटर लांबीचे अंतर ठेवावे अशी मागणी करीत होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.(Latest Marathi News)

समितीची शिफारस मुख्यमंत्र्यांनी स्वीकारुन दोन खांबांमधील अंतर ६० मीटरवरुन १२० मीटर करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. आजमितिस एकूण प्रकल्पाचे सुमारे ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. सदर कामे मे २०२४ पूर्वी पूर्ण करण्याचे अपेक्षित असल्याची माहिती चहल यांनी दिली.

१५८ किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण -

सन २०२२ पूर्वी मुंबईत साधारण ९९० कि.मी. रस्त्यांचे सिमेंट कॉक्रिटीकरण झालेले आहे. तसेच २६५ कि.मी. रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणाचे काम चालू आहे. त्यापैकी १५८ कि.मी. रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. अशाप्रकारे मुंबईत एकूण ११४८ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉक्रिटीकरण झाले आहे.(Latest Marathi News)

कामावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे तसेच कामाचा दर्जा तपासण्यासाठी किमान ५० टक्के चाचण्या नामांकित प्रयोगशाळेत तपासणे अनिवार्य केले. पावसाळयात खड्डे बुजविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT