BMC sakal media
मुंबई

तिसर्‍या लाटेची भीती : प्रत्येक हाय रिस्क वॉर्डात एका रूग्णामागे 32 जणांच्या चाचण्या

वैद्यकीय अधिकाऱ्यांना महापालिकेचे आदेश

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत जरी कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) आली नसली तरी त्याबाबतची चिंता आधीपासूनच पालिकेला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाच्या नवीन (Corona New Patient) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पालिकेने याकडे गांभीर्याने पाहिले आहे. त्याअंतर्गत, पालिकेने (BMC) तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना (Doctors) प्रत्येक हाय रिक्स प्रभागातील एका रुग्णाच्या मागे 32 जणांची तपासणी करण्याचे आदेश जारी केले आहेत.(BMC conducts 32 test behind high risk ward corona patients)

23 जूनपासून मुंबईतील काही वॉर्डांमध्ये कोरोनाचे नवीन केसेस वाढले आहेत. याची गंभीरपणे दखल घेत महापालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत, महामारी कक्ष दररोज मुंबईतील 10 हाय रिस्क प्रभागांची ओळख पटवणार आहे. या ठरवलेल्या वॉर्डात वैद्यकीय अधिका-यांना एका पाॅझिटिव्ह रूग्णाच्या मागे 32 जणांची चाचणी घ्यावी लागेल. या व्यतिरिक्त, पाॅझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात येणार्‍या लोकांचे 100 टक्के संपर्क ट्रेसिंग 72 तासांत पूर्ण करावे लागेल. संपर्क ट्रेसिंगमध्ये आढळलेल्यांपैकी उच्च जोखीम प्रकारात सापडलेल्या व्यक्तींची कोरोना तपासणी 5 दिवस किंवा जर त्यांच्यात काही लक्षणे आढळली तर 14 दिवसांच्या आत करावी लागेल.

आरोग्य कक्ष राबवणार तपासणी शिबीर

प्रत्येक प्रभागातील वॉर रूम्स त्या आरोग्य कक्षांना सूचित करतील जिथे सर्वाधिक कोरोना सापडत आहेत. या अंतर्गत कोणत्या भागात अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. याची ही माहिती मिळेल. या माहितीनंतर तेथे आरोग्य पथकामार्फत चाचणी शिबिरे आयोजित केली जातील. चाचणीद्वारे प्राप्त झालेल्या नव्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाच्या उच्च अधिकार्यांना पाठवली जाईल.

लक्षणे दिसल्यास दवाखान्यात तपासणी

मुंबईच्या विविध भागात पालिका दवाखाने कार्यरत आहेत. या दवाखान्यात येणाऱ्या लोकांना अतिसार, उलट्या, डोकेदुखी, घश्यात खवखव, ताप यांसारख्या तक्रारी असल्यास आरटीपीसीआरमार्फत संबंधित प्रभागातील वैद्यकीय अधिकार्यांना अशा लोकांची कोरोना तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक व्यक्तीमागील संपर्क ट्रेसिंग वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आतापर्यंत एका व्यक्ती मागे किमान 10 लोकांचे ट्रेसिंग केले जात होते. पण, आता ही संख्या वाढवून एका व्यक्तीमागे 15 हून अधिक ट्रेसिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हाय रिक्स प्रभागाव्यतिरिक्त इतर प्रभागांतही संपर्क ट्रेसिंग वाढवले जात आहे. या कामात स्थानिक पातळीवर काम केलेले वैद्यकीय अधिकारी महत्वाची भूमिका बजावतील.

सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT