fake employee arrest sakal media
मुंबई

महापालिकेत एकाच नावाचे दोन कर्मचारी ; तोतयाला अखेर अटक

अनिष पाटील

मुंबई : मागच्या 28 वर्षांपासून मुंबई महापालिकेत (bmc) माळी (gardner) म्हणून काम करणाऱ्या बोगस कर्मचाऱ्याला (fake employee) आझाद मैदान पोलिसांनी (azad maidan police) अखेर अटक (arrest) केली. महापालिकेतील दुस-या कर्मचा-याच्या कागदपत्रांचा वापर करून त्याने महापालिकेत तब्बल 28 वर्ष नोकरी केली होती. त्यामुळे महापालिकेतून 43 लाखांचा पगार घेऊन त्याचे फसवणूक (fraud) केल्याचा आरोप आहे. तहसील कार्यालयात आरोपीला भेटलेल्या व्यक्तीने बनावट कागदपत्रे (fake documents) दिल्याचे त्याने चौकशीत सांगितले आहे.

रमेश शेलार (53) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक आधारकार्ड व दोन पॅनकार्ड सापडले आहेत. त्यातील एक पॅनकार्ड शेलारच्या नावाचे आहेत. आरोपी शेलार 5 सप्टेंबर 2017 पर्यंत महापालिकेत माळी म्हणून काम करत होता. त्याने दिलेल्या जातीचा दाखला व इतर कागदपत्रांची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी छाननी केली. त्यानंतर ती कागदपत्रे महापालिकेत काम करणाऱ्या सोपान मारुती साबळे या शिपाई कर्मचाऱ्याच्या कागदपत्रांसारखीच असल्याचे समोर आले.

त्यानंतर माळी म्हणून काम करणाऱ्या बोगस कर्मचाऱ्याचा पर्दाफाश झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1989 मध्ये सोपान साबळे महापालिकेत शिपाई कर्मचारी म्हणून कामावर रुजू झाले. त्यानंतर 1993 मध्ये साबळे यांच्याच नावाने एक कर्मचारी माळी म्हणून कामावर दाखल झाला. त्याची आणि साबळे शिपाईची कागदपत्रे एकसारखीच होती. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या माळी कर्मचाऱ्याला खरी कागदपत्रे सादर करण्यास सांगितली. त्यानंतर 5 सप्टेंबर 2017 पासून त्याने कामावर यायचे बंद केले. त्यानंतर महापालिकेकडून त्याने दिलेल्या पत्त्यावर एक पत्र पाठवले.

मात्र ते पत्र साबळे यांच्या घरच्या पत्त्यावर पोहोचल्याने एकच खळबळ उडाली आणि त्या माळी कर्मचाऱ्याने फसवणूक केली असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी सुनिल जंगले यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या बोगस कर्मचाऱ्याने तब्बल 43 लाख 31 हजार 10 रुपयांचीमहापालिकेची फसवणूक केली असल्याची माहिती जंगले यांनी पोलिसांना दिली. "आपीसीच्या कलम 419 आणि 420 अंतर्गत बोगस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बँक खात्यातून पकडला गेला आरोपी

आरोपीचा पगार जमा होत असलेल्या बँक खात्यातून एका व्यक्तीच्या बँक खात्यात नियमीत रक्कम जात होती. त्यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तीला विचारले असता आरोपीची ओळख रमेश शेलार म्हणून पटली. तो मुंबईत येणार असल्याचेही आझाद मैदान पोलिसांना जमजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शेजारला अटक केली. आरोपीने चौकशीत पुण्यातील जुन्नर येथील तहसीलदार कार्यालयात 28 वर्षांपूर्वी त्याला एक व्यक्ती भेटला होता. त्याने आरोपीला साबळेच्या नावाची बनावट कागदपत्रे दिल्याचे चौकशीत सांगितले आहे. त्या कागदपत्रांच्या सहाय्याने किसन नावाच्या व्यक्तीने शेलारला महापालिकेत कामाला लावले होते. आता पोलिस या माहितीची पडताळणी करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT