मुंबई

'हे' आहेत मुंबईतील ८ कोरोना हॉटस्पॉट, इथे आहेत मुंबईतील सर्वाधिक COVID19 रुग्ण

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रात मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत. दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतोय. अशात मुंबईकरांची चिंता वाढताना दिसतेय. याच कारण म्हणजे मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. काल म्हणजेच ५ एप्रिल २०२० पर्यंत मुंबईत कोरोनाचे ४ हॉटस्पॉट होते. त्याच चार हॉटस्पॉटची संख्या आता ८ वर गेलीये. म्हणजेच मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची  संख्या दुपटीने वाढलीये.

कोरोना हॉटस्पॉट म्हणजे मुंबईतील 'या' भागांमध्ये सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. 

कोणते आहेत हे नवीन कोरोना हॉटस्पॉट ?  

इ वॉर्ड, एच इस्ट वॉर्ड, पी नॉर्थ वॉर्ड आणि एम वेस्ट वॉर्ड यांचा  नवीन हॉटस्पॉटमध्ये समावेश आहे.   

  1. आतापर्यंत मुंबईतील जी साऊथ या वॉर्डात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. या जी साऊथ वॉर्डात वरळीचा बहुतांश भाग येतो. त्याचबरोबर परळ ST डेपो, BDD चाळ, वरळी कोळीवाडा, महालक्ष्मी रेसकोर्स नेहरू तारांगण आणि शांतीनगर हा भाग आहे. या भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८ वर गेलीये. हा वॉर्ड मुंबईत कोरोना हॉटस्पॉटमध्ये  १ नंबरवर आहे. 
  2. या मागोमाग मुंबईतील E वॉर्ड हा दुसऱ्या नंबरवर आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा वॉर्ड कालपर्यंत कोरोना हॉटस्पॉटमध्ये नव्हता. या भागात कोरोनाचे ४४ रुग्ण आहेत. जिजामाता उद्यान, जेजे हॉस्पिटल, माझगाव डॉक, नायर हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल हे भाग या वॉर्डात येतात. 
  3. या मागोमाग के वेस्ट भाग, म्हणजेच अंधेरी वर्सोवा हा भाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. याठिकाणी सध्या ३७ रुग्ण आहेत.     
  4. या मागोमाग डी वॉर्ड मध्येदेखील कोरोना रुग्ण आहेत. डी वॉर्ड म्हणजे खेतवाडी, कमला नेहरू पार्क, प्रियदर्शनी, ऑपेरा हाऊस, वेलिंग्टन स्पोर्ट्स क्लब, बेलासिस चाळ हा भाग. याठिकाणी ३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. 
  5. त्यामागोमाग के इस्ट वॉर्डात आता रुग्णसंख्या वाढून आता २६ झालीये. के इस्ट वॉर्ड म्हणजे जोगेश्वरी, चकाला, गोंदिवली, विले पार्ले टेलिफोन एक्सचेन्ज हा भाग येतोय. 
  6. यानंतर नवीन हॉटस्पॉट जो समोर एच इस्ट वॉर्ड,  म्हणजे वांद्रे पूर्व, टीचर्स कॉलनी, भारत नगर, खेरवाडी वांद्रे टर्मिनल  हा भाग. महत्त्वाची बाब म्हणजे  मुख्यमंत्री देखील याचा भागात राहतात.     
  7. याशिवाय पी नॉर्थ वॉर्ड भाग नव्याने हॉटस्पॉटमध्ये गणला गेलाय. यामध्ये २४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये पुष्पा पार्क, तानाजी नगर, लिबर्टी गार्डन हे भाग पी नॉर्थ वॉर्ड अंतर्गत येतात    
  8. याचसोबत आणखीन एक नवीन हॉटस्पॉट महापालिकेकडून नमूद केला गेलाय. हा वॉर्ड आहे एम वेस्ट वॉर्ड. यामध्ये टिळक नगर, छेडा नगर या भागांचा समावेश आहे. यामध्ये एकूण २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.   

BMC has defined four new corona hotspots in mumbai count hof hotspot goes on eight 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Accident: काॅंग्रेस नेते नितीन राऊत अपघातात बालंबाल बचावले, कारला ट्रकने धडक दिली अन्....

Mumbai Crime: गोराई बीचवरील हत्येचा उलगडा; मृतदेहाचे केले होते सात तुकडे, हातावरील टॅटूमुळे पटली ओळख

Children's Day Specile Recipe: बालदिनानिमित्त मुलांसाठी बनवा चवदार रोटी पिज्जा, सोपी आहे रेसिपी

Mumbai Police : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; रायचूरमधून गीतकाराला अटक

Mumbai: कामाठीपुरातील महिलांचा संकल्‍प, विधानसभेसाठी करणार १०० टक्‍के मतदान

SCROLL FOR NEXT