sheltar home 
मुंबई

Cyclone Nisarga: मुंबई महापालिकेनं 'या' ठिकाणी केली राहण्याची सोय..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- निसर्ग चक्रीवादळने आपले रौद्र रुप धारण केलं आहे. कोकण किनारपट्टीवर रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ श्रीवर्धन, दिवेआगर येथे हे वादळ धडकले आहे. चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचा परिघ 60 किलोमीटर इतका मोठा आहे. चक्रीवादळ वेगाने ताशी 55 किमी वेगाने मुंबईच्या दिशेन सरकत आहे. या वादळामुळे कोकण किनारपट्टी प्रभावित झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता मुंबईच्या समुद्र किनारी राहणाऱ्या रहिवाशांसाठी महापालिका प्रशासनानं तात्पुरती राहण्याची सोय केली आहे. जीवित हानी टाळण्यासाठी 40 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. तसंच किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या तुकड्या मदत कार्यासाठी सज्ज आहेत.  

मुंबई महापालिकेनं सुमारे 35 शाळांमध्ये  नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. माहीम पथ्थरवाडीमधल्या 250 लोकांना कॉज वे येथील महापालिका शाळेत हलवण्यात आलं आहे. आपत्कालीन स्थितीत मुंबईकर नागरिक हेल्पलाईन क्रमांक 1916 डायल करून त्यानंतर 4 दाबून आवश्यक ती मदत मागू शकतात, असंही पालिकेतर्फे सांगण्यात आलं आहे.

मुंबई किनारपट्टीच्या जवळ राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्याचे काम मुंबई पोलिस आणि महानगर पालिकेतर्फे करण्यात येत आहे. गीतानगरमधील 11 हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे.  आवश्यकता लागल्यास नागरिकांना स्थलांतरित होण्याचं आवाहन देखील महापालिकेकडून करण्यात आलं आहे. 

मुंबईतील वेगवेगळया भागांमध्ये NDRF च्या 8 आणि नौदलाच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कुलाबा (Ward A), वरळी (G/South), वांद्रे (H/East), मालाड (P/South), बोरीवली (R/North) या भागात प्रत्येकी 1 आणि अंधेरीत (K/West) 3 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबईतल्या सहा समुद्र किनाऱ्यांवर 93 लाइफगार्ड्स तैनात करण्यात आले आहे. तसंच आपातकालीन परिस्थिती उदभवल्यास त्याचा सामना करण्यासाठी मुंबईत अग्निशमन दलाला अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

bmc has shifted people who lives at sea shore to these places read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT