मुंबई

कोरोना लसीकरणावेळी पालिका राबवणार टोकन सिस्टम, गर्दी टाळण्यासाठी निर्णय

भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोना लसीकरणावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी पालिका टोकन सिस्टम राबवणार आहे. शिवाय, कोरोना लसीकरण दोन शिफ्टमध्ये केले जाणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते 8 रात्री या वेळेत पालिकेने दोन शिफ्टमध्ये काम करण्याचे ठरवले आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत कोविड-19 लसीचा साठा येईपर्यंत सर्वांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, पालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये समर्पित कोविड लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरणासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची काळजी घेतली जात आहे.

लसीकरणासाठी पालिकेसह रुग्णालये ही सज्ज आहेत. शहरातील 8 लसीकरण केंद्रांपैकी डॉ. आर.एन. कूपर रूग्णालयातील एक मॉडेल सेंटर सोमवारी तयार झाले असून इतर सात या आठवड्याच्या शेवटी तयार होतील, असे  सांगतानाच त्यांची तयारी पूर्णपणे असल्याचे सांगितले गेले आहे. लसीकरण प्रक्रियेदरम्यान होणारे संभाव्य अडथळे टाळण्यासाठी पालिकेने ड्राय रन चालवण्याची योजना आखली आहे.

या साठी 1,367 प्रशिक्षित लसी देणाऱ्यांचा वापर करुन आणि मुंबईला पुरेसे डोस पुरवले गेले तर आठ केंद्रांवर दररोज 8 हजार ते 12 हजार लोकांना लसीकरण करण्याची महापालिकेची योजना आहे. पहिल्या टप्प्यात 1.6 लाख आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना दोन आठवड्यातच लसीकरण करण्याचा पालिकेने घेतला आहे. डॉ आरएन कूपर, केईएम, सायन आणि नायर रुग्णालयात 10 लसीकरण बूथवर दररोज 2 हजार लोकांना लसीचा डोस दिला जाईल. इतर चार केंद्रांवर राजावाडी, व्ही.एन. देसाई, कांदिवली शताब्दी आणि वांद्रे भाभा रुग्णालयात एका दिवसात हजार लोकांचे लसीकरण करण्यासाठी 5 बूथची स्थापना केली गेली आहे.

प्रत्येक केंद्रात 10 ते 20 लस देणारे असतील. प्रत्येक दिवसाला 100 लोकांचे लसीकरण होईल. लसीकरणाच्या वेळी प्रत्येकी दोन बूथवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरही असतील अशी माहिती पालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

गर्दी  होऊ नये म्हणून टोकन देणार

जर एका बूथवर किंवा केंद्रात एका वेळी 100 जण लस घेण्यासाठी आले तर तिथे गर्दी होण्याची शक्यता आहे. चौकशीच्या बूथवर होणारी गर्दी टाळण्यासाठी ही टोकन सिस्टम पालिका राबवणार आहे. लसीकरणासाठी ज्या व्यक्तीचा नंबर आहे त्यांना तो स्क्रिनवर दिसेल. म्हणजेच जे लोक लसीकरणासाठी आले आहेत. त्यांचा नंबर येईपर्यंत ते प्रतिक्षा रुममध्ये बसून राहतील. म्हणजेच त्या काऊंटरवर गर्दी होणार नाही यासाठी ही काळजी घेतली गेली आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.

ज्यांना संदेश त्यांनाच लसीकरण

पालिकेने कोविड लस इंटेलिजेंस वर्क (को-विन) सॉफ्टवेअरवर 1.26 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा नोंद केला आहे. एक स्वयंचलित सिस्टम अनुक्रमे नोंदणीकृत आरोग्य कर्मचाऱ्यांची निवड करेल आणि ज्यांना लसीकरण करावयाचे आहे त्यांना दिनांक, वेळ आणि केंद्राचा तपशील सांगणारा एक एसएमएस पाठवेल. डॉ. गोमारे यांनी सांगितले, की फक्त नोंदणी केलेल्या आणि ज्यांना एसएमएस पाठवला गेला आहे त्यांनाच लसीकरण केंद्रात प्रवेश दिला जाईल.

सर्व विभागाचे सहकार्य

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, लसीकरण जसजसे सुरू होईल तसतसे या अडचणींवर मात करणे किंवा त्यातून उपाय शोधणे सोपे होईल. मुंबईत 10 सदस्यीय टास्क फोर्स पोलिस, शिक्षण विभाग, घनकचरा व्यवस्थापन, संयुक्त राष्ट्र विकास निधी, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे सहकार्यासाठी घेतले जाईल.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

bmc implement token system during corona vaccination decision avoid crowd

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT