नव वर्षाच्या स्वागतानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी BMC ने नवी नियमावली जाहीर केली आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉन (Omicron) हा वेगाने जगभरात पसरत आहे. भारतातही महाराष्ट्रात (Maharashtra) ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे. तर मुंबईतील (Mumbai) रुग्ण वाढीचा वेगही चिंताजनक असा आहे. त्यातच आता नव वर्षाच्या स्वागतानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी BMC ने नवी नियमावली जाहीर केली आहे. पालिकेने नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. यात म्हटलं की, 'कोविड १९' विषाणूचा 'ओमायक्रॉन' हा नवीन प्रकार जगात वेगाने पसरतोय . त्यामुळे आपण सर्वांनी गाफील न रहाता कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आत्यंत गरजेचे आहे.
नववर्ष स्वागताच्या हेतूने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत, कोणत्याही बंदिस्त अथवा मोकळ्या किंवा खुल्या जागेत सोहळा / समारंभ / पार्टी अथवा इतर कोणत्याही उपक्रमाच्या आयोजनावर बंदी
25 ट्क्के उपस्थितीत लग्नसमारंभ किंवा कार्यक्रम
लग्न समारंभ तसेच कोणत्याही सामाजिक / राजकीय अथवा धार्मिक स्वरुपाच्या कार्यक्रमासाठी, बंदिस्त जागेत १००, खुली जागा असल्यास तर २५० किंवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के; यापैकी जी संख्या कमी असेल, तेवढ्याच व्यक्तिंच्या उपस्थितीस परवानगी वरील दोन्ही बार्बीमध्ये समाविष्ट नसलेल्या इतर कोणत्याही आयोजनप्रसंगी, बंदिस्त व कायमस्वरूपी आसन व्यवस्था असलेल्या जागी क्षमतेच्या ५० टक्के तर कायमस्वरुपी आसन व्यवस्था नसलेल्या बंदिस्त जागी क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीस परवानगी !
हॉटेल्समध्ये ५० टक्के क्षमतेनं परवानगी
सर्व उपहारगृहे, व्यायामशाळा, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे याठिकाणी मंजूर क्षमतेच्या ५० टक्के इतकीच उपस्थिती असावी. या सर्व आस्थापनांनी जागांची मंजूर पूर्ण क्षमता व ५० टक्के क्षमता या दोन्ही बाबी जाहीर कराव्यात
क्रीडा स्पर्धेसाठी २५ टक्केच प्रेक्षक
क्रीडा स्पर्धा / समारंभांच्या आयोजनाप्रसंगी प्रेक्षकांची संख्या ही आसन क्षमतेच्या २५ टक्के इतकीच असावी • सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंनी समूहाने एकत्र वावरण्यास मनाई. सर्व नागरिक / आयोजक / आस्थापना यांनी कोविड प्रतिबंधक नियमांचे सक्तीने पालन करावे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
कोणत्याही नियमांचे उल्लंघन आढळल्यास 'भारतीय दंडविधान संहिता' आणि 'आपत्ती व्यवस्थापन अधिनियम' नुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीकरण पूर्ण करून घ्यावे. सार्वजनिक ठिकाणी लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच योग्य ती मुभा दिली जाईल असंही महापालिकेनं म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.